बीजिंग, 15 मे : कोरोनानं साऱ्या जगात थैमान घातले आहे. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या या व्हायरसवर अद्याप कोणतीही लस मिळालेली नाही आहे. त्यामुळं आता जगभरातील शास्त्रज्ञ औषध शोधण्यावर भर देत आहेत. दरम्यान, चीनी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू नष्ट करण्याचा फॉर्म्युला शोधल्याचा दावा केला आहे. चिनी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोनाला एका अँटीबॉडीने हरवणं कठिण असल्यामुळं चार औषधं एकत्र करून कोरोना रुग्णांवर त्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. चिनी शास्त्रज्ञांच्या मते ही चार अँटीबॉडी एकत्र कोरोना विषाणूवर सर्वतोपरी आक्रमण करता येईल. यामुळं कोरोना विषाणूचे बाह्य थर नष्ट होईल, त्यामुळं ते आपल्या शरीरातील पेशींना चिकटणार नाही. चीनमधील 24 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. या चार अँटीबॉडीजमुळं कोरोनाला काही प्रमाणात मारण्यात यश येईल. आता चिनी शास्त्रज्ञांना आशा आहे की या चार अँटीबॉडीमुळे ते कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी सर्वोत्तम लस तयार करतील. शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की जर काहीही झाले नाही तर किमान ते अशी लस तयार करतील जेणेकरुन कोरोना विषाणूचा नाश न केल्यास त्यांना रोखता येईल. म्हणजे प्रतिबंधक लस. वाचा- डॉक्टरांना सर्वात मोठं यश! ‘ही’ तीन औषधं वापरून 7 दिवसांत बरा झाला कोरोना रुग्ण
वाचा- लस शोधण्यासाठी निरोगी लोकांना करणार कोरोना पॉझिटिव्ह? WHOची वादग्रस्त चाचणी चीनच्या बीजिंग मेडिकल युनिव्हर्सिटी, बीजिंग इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायन्ससह चीनमधील सुमारे डझन वैज्ञानिक संस्था आणि प्रयोगशाळांमधील शास्त्रज्ञ या चार अँटीबॉडीज शोधण्यात गुंतले होते. अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स या मासिकामध्ये या चारही अँटीबॉडीज शोधाचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशी आहेत औषधांची नावं शास्त्रज्ञांनी शोधलेल्या चार अँटीबॉडींची नावं-बी 38, एच 4, बी 5 आणि एच 2 अशी आहेत. ही 4 अँटीबॉडी आपल्या शरीरातील पेशींवर असलेल्या एन्झाइम एसीई -2 वर कोरोनाला टिकू देत नाही. या चार अँटीबॉडीमुळे व्हायरसमध्ये असलेले एस-प्रथिने वितळण्यास सुरवात होते आणि काही काळानंतर व्हायरस अदृश्य होतो. या अँटीबॉडी कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णकडून घेतल्या जातात. प्रयोगशाळेत उंदीरांवर त्यांचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. वाचा- भारत करणार कोरोनावर मात! 1500 रुग्णांवर WHO करणार ‘या’ 3 औषधांचं ट्रायल हॉंगकॉंगनं ही 3 औषधं वापरून केला होता उपचार हाँगकाँगच्या 6 शासकीय रुग्णालयांमधील विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या 127 रुग्णांवर औषधांचा वापर केला, असे सांगितले. हाँगकाँगच्या 6 रुग्णालयांमध्ये तीन औषधांचे मिश्रण देण्यात आलेली 86 रुग्ण निरोगी झाली. कारण त्यात तीन अँटीवायरल औषधे होती. यातील प्रथम अँटीवायरल औषध म्हणजे लोपीनावीर-रीटोनाविर (lopinavir-ritonavir-kaletra). रिबाविरिन नावाचे आणखी एक औषधं हे हेपेटायटीस-सीच्या उपचारात वापरली जाते. तिसरे औषध इंजेक्शन आहे. त्याचे नाव इंटरफेरॉन बीटा -1 बी (Interferon Beta-1B) आहे. हे औषध मल्टिपल स्क्लेरोसिस बरे करते जेणेकरून शरीरात वेदना, जळजळ आणि व्हायरस पसरत नाहीत. काही तज्ञांचे मत आहे की इंटरफेरॉन बीटा -1 बी औषध शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करते. जेणेकरुन मानवी शरीर कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढू शकेल. वाचा- …तर कोरोना कधीच नष्ट होणार नाही, WHOचा धक्कादायक खुलासा