JOIN US
मराठी बातम्या / विदेश / दोन वर्षांत पहिल्यांदाच चीनमधील सर्व प्रांतात पसरला कोरोना, महत्त्वाची शहरे Lockdown

दोन वर्षांत पहिल्यांदाच चीनमधील सर्व प्रांतात पसरला कोरोना, महत्त्वाची शहरे Lockdown

China Covid Cases: चीनमधील सुमारे 12,000 सरकारी रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी आता जागा नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनने कडक लॉकडाऊनचा नियम केला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 31 मार्च : चीनमध्ये कोरोनाव्हायरस (Coronavirus) दोन वर्षांत प्रथमच सर्व 31 प्रांतांमध्ये पसरला आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनने राबवलेले शून्य कोविड धोरण फोल ठरत आहे. कोरोनाचे नवीन प्रकार Omicron (Covid Omicron variant) च्या संक्रमित लोकांची संख्या 62 हजारांवर गेली आहे. अशा परिस्थितीत चीनची आर्थिक राजधानी शांघायसह 5 शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लागू केला आहे. हॉस्पिटल भरली चीनमधील सुमारे 12,000 सरकारी रुग्णालयांमध्ये नवीन रुग्णांना दाखल करण्यासाठी आता जागा नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चीनने कडक लॉकडाऊनचा नियम केला होता. त्यावेळी एक रुग्ण जरी सापडला तरी संपूर्ण शहरात लॉकडाऊन लागू करण्यात येत होता. मात्र, आता वैद्यकीय रचनेत मोठा बदल झाला आहे. शांघायचे 20 हजार बँकर्स कार्यालयातच चीनच्या मोठ्या व्यावसायिक हब शांघायमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बँकिंग आणि इतर कामे विस्कळीत होऊ नयेत, यासाठी शांघायमधील सुमारे 20 हजार कर्मचारी कार्यालयात राहत आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. हे वाचा -  पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत असलेले शाहबाज शरीफ कोण आहेत? चीनमध्ये 88 टक्के लसीकरण, वृद्धांमध्ये 52 टक्के चीन हा जगातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे. चीनमध्ये, 88 टक्के पेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे, परंतु असे असूनही, चीनमधील केवळ 52 टक्के वृद्ध लोकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दुसरा डोस मिळू शकला आहे. हे वाचा -  पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा! मुंबई हल्ल्याबाबत दिली मोठी कबुली कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारत संकटात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तज्ज्ञ डॉ. आर.आर. गंगाखेडकर यांनी न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, व्हायरस जितका जास्त म्यूट होतो तितका धोका वाढतो. त्यांनी सांगितले की, चीनमध्ये कोविडचा उद्रेक भारतालाही हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे तेथील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्याच वेळी, चीन आणि इतर देशांमध्ये पसरलेल्या कोरोनामुळे भारताला निर्माण झालेल्या धोक्यावर अनेक तज्ज्ञांनी आपले मत दिले आहे आणि त्यापैकी बहुतेकांचे मत आहे की, भारताने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या