Home /News /videsh /

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत असलेले शाहबाज शरीफ कोण आहेत?

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत असलेले शाहबाज शरीफ कोण आहेत?

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पंतप्रधानपदी (Prime Minister) जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानात (Pakistan) सुरुवातीपासून आतापर्यंत जेवढे पंतप्रधान आहेत, त्यापैकी एकालाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही.

    इस्लामाबाद, 30 मार्च : पाकिस्तानात (Pakistan) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वेगानं राजकीय (Political) घडामोडी घडत आहेत. एकूण राजकीय स्थिती आणि घडामोडी पाहता पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांची खुर्ची जाणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. अविश्वास प्रस्तावापूर्वीच इम्रान खान राजीनामा देतील अशी देखील चर्चा आहे. पाकिस्तानच्या इतिहासात मुदतीपूर्वी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागणारे इम्रान खान हे पहिले नाहीत. पाकिस्तानमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत ज्या व्यक्ती पंतप्रधान झाल्या, त्यापैकी एकही व्यक्ती आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेली नाही. पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी सुमारे 3 वर्षं 10 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पाकिस्तानातल्या राजकीय घडामोडींमुळे ते लवकरच या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदासाठी शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) याचं नाव विशेष चर्चेत आहे. ते `नेक्स्ट पीएम ऑफ पाकिस्तान` असल्याचं सांगितलं जात आहे. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू आहेत. या व्यतिरिक्त त्यांची राजकीय कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण आणि वादग्रस्तदेखील आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने त्यांच्याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी 30 मार्चला दुपारी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक बोलावली होती. आपलं सरकार पाडण्याच्या षड्यंत्रामागे विदेशी शक्तींचा हात आहे, असं इम्रान यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांच्या नावाची चर्चा आहे. पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात पाकिस्तानी सैन्य (Pakistan Military) कोणत्याच पक्षाची बाजू घेत नसल्याचं काही दिवसांपूर्वी शाहबाज यांनी म्हटलं होतं. पंतप्रधानपदासाठी त्याचं नाव चर्चेत येताच, त्यांच्या घरात हालचाली वाढल्या आहेत. त्यांना पीएम प्रोटोकॉल देण्याची तयारी सुरू झाली आहे. Pakistan news: इम्रान खान यांचा शेवटचा डाव, शेअर करणार सिक्रेट लेटर बॉम्ब! यानंतर राजीनामा देणार का? जाणून घ्या 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनकडून (PML-N) शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. परंतु, त्या वेळी इम्रान खान यांचा तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष विजयी झाला आणि इम्रान खान पंतप्रधान झाले. त्या वेळी शाहबाज खान यांची विरोधी पक्षनेता (Opposition Leader) म्हणून निवड करण्यात आली. शाहबाज शरीफ यांचा 1951 मध्ये लाहोर येथे जन्म झाला. मियाँ मोहम्मद शाहबाज शरीफ असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचे मोठे बंधू नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते; मात्र पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अयोग्य घोषित केल्यानं ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. शाहबाज शरीफ यांचे वडील मोहम्मद शरीफ एक व्यापारी होते. त्यांची आई पुलवामा येथील रहिवासी होती. व्यापाराच्या निमित्तानं त्यांचं नेहमी काश्मीरमध्ये येणं-जाणं होतं. नंतरच्या काळात त्याचं कुटुंब पंजाबमधल्या अमृतसर येथे स्थायिक झालं. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर मोहम्मद शरीफ आपल्या परिवारासह लाहोर (Lahor) येथे स्थायिक झाले. नवाज शरीफ यांच्या व्यतिरिक्त शाहबाज यांना अब्बास शरीफ नावाचे मोठे बंधू आहेत. 1973 मध्ये शाहबाज त्यांच्या चुलत बहिणीशी विवाहबद्ध झाले. या दाम्पत्याला चार मुलं आहेत. 2003 मध्ये शाहबाज यांनी दुसरा विवाह केला. शाहबाज शरीफ यांनी लाहोर गव्हर्नमेंट कॉलेजमधून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर एक उद्योगपती म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय सांभळण्यास सुरुवात केली. 1985 मध्ये ते लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1987-88 पासून त्यांनी सक्रिय राजकारणास सुरुवात केली. राजकीय जीवनात त्यांनी चढ-उतार पाहिले आहेत. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा! मुंबई हल्ल्याबाबत इम्रान खान यांच्यासमोर दिली कबुली पाकिस्तान मुस्लिम लीग-एनचे नेते शाहबाज शरीफ हे अत्यंत कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. सध्या ते विरोधी पक्षनेते असून, अनेक मुद्द्यांवरून ते इम्रान खान सरकारवर टीका करत आहेत. 1988 ते 1990 पर्यंत ते पंजाब विधानसभेचे सदस्य होते. 1990 ते 1993 दरम्यान ते नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते. ते तीन वेळा पंजाब प्रांताचे (पाकिस्तान) मुख्यमंत्री होते. सर्वप्रथम फेब्रुवारी 1997 मध्ये त्यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ऑक्टोबर 1999 पर्यंत ते या प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर जून 2008 ते मार्च 2013 दरम्यान ते दुसऱ्यांदा पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा 2013 ते 2018 पर्यंत ते या प्रांताचे सीएम होते. शाहबाज शरीफ यांना कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं होतं. सप्टेंबर 2020 मध्ये शाहबाज यांना मनी लॉड्रिंगच्या (Money laundering) प्रकरणात एनएबीनं अटक केली होती. विरोधी पक्षातल्या नेत्यांवर राजकीय हेतूनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पक्षानं सरकारवर केला होता. लाहोर उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं त्यांना न्यायालयातच अटक करण्यात आली होती. एप्रिल 2021 मध्ये लाहोर उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. परंतु हा खटला अद्याप सुरूच आहे.
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या