मॉस्को, 24 मार्च : रशिया युक्रेनवर जवळपास महिनाभरापासून हल्ला करत आहे (Russia-Ukraine War). या युद्धाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युद्धाच्या काळात रशियामध्ये कंडोमची विक्री अचानक वेगाने (Condom Sale Hike in Russia) वाढली आहे. एका ब्रिटीश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, देशात कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचे लोक बाजारात कंडोम नसल्यामुळे घाबरले आहेत. त्यामुळे स्टॉक खरेदी करून ठेवला जात आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, रशियाच्या लोकांना भीती आहे की निर्बंधांचा परिणाम कंडोमच्या किमतीवरही होऊ शकतो. बाजारात कंडोमचा पुरवठाही कमी होऊ शकतो. सध्या रशियात अनेक कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे. मात्र, ब्रिटीश कंडोम निर्माता रेकिटने तेथे आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. रशियन ऑनलाइन रिटेलर Wildberries ने ही माहिती दिली आहे. हे वाचा - रशियाने 28 व्या दिवशी टाकला शक्तिशाली बॉम्ब, युक्रेन पुन्हा हादरलं केमिस्टकडून कंडोमची विक्री 32 टक्क्यांनी वाढली रशियन फार्मसी चेन 36.6 PJSC ने म्हटले आहे की, कंडोमच्या विक्रीत 26 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर केमिस्टच्या कंडोमच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशियन सुपरमार्केटच्या मते, कंडोमच्या विक्रीत 30 टक्के वाढ झाली आहे. हे वाचा - करोडोंची कॅश घेऊन पळून चालली होती नेत्याची ग्लॅमरस पत्नी, अधिकाऱ्यांनी पकडलं,आणि लोक स्टॉक करत आहेत मॉस्कोमधील प्रौढ स्टोअरची सह-भागीदार येसेनिया शमोनिना यांनी सांगितले की, लोक भविष्यात कमी पडू नयेत म्हणून कंडोम स्टॉक करत आहेत. देशात कंडोमच्या किमतीही वाढल्या आहेत. पाश्चात्य चलनाच्या संदर्भात रशियन रुबल कमकुवत झाला आहे, ज्यामुळे वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.