JOIN US
मराठी बातम्या / विदेश / बायडेन यांनी पुतीन यांना Killer संबोधल्यानंतर रशियात हालचालींना वेग; घेतला मोठा राजकीय निर्णय

बायडेन यांनी पुतीन यांना Killer संबोधल्यानंतर रशियात हालचालींना वेग; घेतला मोठा राजकीय निर्णय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा उल्लेख ‘खूनी’ (Murderer) असा केला आहे. त्यामुळे रशियातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 19 मार्च: अमेरिकेच्या (America) गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानंतर ( Intelligence Report) रशियामध्ये (Russia) खळबळ उडाली आहे. त्यामुळे रशियाने अमेरिकेतील आपल्या राजदूताला परत मायदेशी (Russian Ambassador call back to Moscow) बोलावलं आहे. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा उल्लेख ‘खूनी’ (Murderer) असा केला आहे. तसेच पुतीन यांना याची किंमत द्यावी लागेल, असा इशाराही अमेरिकेनं दिला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबमध्ये अमेरिकेत पार पडलेल्या निवडणुकीत पुतीन यांनी हस्तक्षेप केल्याचं गुप्तचर अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बायडेन यांना अमेरिकेच्या इंटेलिजन्स रिपोर्टबद्दल विचारलं गेलं होतं. पुतीन यांनी ट्रम्प यांना निवडणुकीत मदत करण्यासाठी आणि बायडेन यांना हरवण्यासाठी अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप केला होता, असा दावा इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती बायडेन यांनी दिली आहे. या अपराधाची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर रशियातील विरोधी पक्षनेते अ‍ॅलेक्सी नवेलनी यांना विष देण्याचा आरोपही व्लादिमीर पुतीन यांच्यावर केला गेला आहे. यावेळी बायडेन यांना विचारण्यात आलं की, तुम्ही पुतीन यांना ‘खूनी’ मानता का? या प्रश्नाचं उत्तर देताना बायडेन यांनी होकारार्थी उत्तर दिलं आहे. बायडेन यांच्या या वक्तव्यानंतर रशियात हालचाली वाढल्या आहेत. हे ही वाचा - Explainer : चीनवर घोंघावतंय का घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ? नवलेनी यांना विष दिल्यामुळे रशियावर लादलेल्या निर्बंधात अधिक कठोर करत असल्याचं अमेरिकेच्या कॉमर्स विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी सल्लामसलत करण्यासाठी रशियाने आपल्या मुत्सद्दीला मायदेशात परत बोलावलं आहे. तथापि दोन्ही देशांतील संबंध बिघडणार नाहीत, यावर रशियाने भर दिल्याचा दिसत आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “वॉशिंग्टनमधील रशियन राजदूत अँटली अँटोनोव्ह यांना सल्लामसलतीसाठी मॉस्को याठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आहे.” हे ही वाचा - व्लादिमीर पुतिन यांना गंभीर आजार, गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून राष्ट्रपतीपद सोडण्याची शक्यता निवेदनात पुढं असंही म्हटलं आहे की, या आमंत्रणाचं उद्दीष्टं अमेरिका- रशिया संबंधात पुढे काय करता येईल, याचं विश्लेषण करणं आहे. रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सार्जेई रेयाबकोव्ह यांनी म्हटलं की, ‘रशिया-अमेरिका संबंध कडूपणा आणण्याची सर्वस्वी जबाबदारी अमेरिकेची असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन देशांतील संबंधात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या