काबूल, 21 ऑगस्ट: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) चा कहर अजूनही कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने काबूल विमानतळावरून (Kabul Airport) 150 लोकांना त्यांच्यासोबत जबरदस्तीने नेलं होतं. स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, तालिबाननं आता त्या 150 लोकांना सोडून दिलं आहे. हे सर्व लोक विमानतळावर परत येत आहेत. अपहरण झालेल्या 150 लोकांमध्ये अफगाण शीख, अफगाण नागरिक आणि बहुतेक भारतीय लोक होते. आज तकनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. सर्व भारतीय सुखरुप अफगाण पत्रकाराच्या मते, सर्व भारतीय सुरक्षित आहेत. ज्या लोकांना तालिबानने सोबत नेलं होतं. त्यांचे पासपोर्ट तपासण्यात आले. सध्या या लोकांना काबूल विमानतळाजवळील गॅरेजमध्ये ठेवण्यात आलं आहे. सरकारी सूत्रांनुसार, सर्व भारतीय लोक तेथे सुरक्षित आहेत आणि अथॉरिटी सतत त्या लोकांच्या संपर्कात आहे. ऑपरेशन Airlift: अफगाणिस्तानातील 85 भारतीय पोहोचणार मायदेशी या लोकांमध्ये, एक व्यक्ती जो त्याच्या पत्नीसोबत होता आणि तालिबानच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला. त्याने सांगितले होते की हे लोकं शुक्रवारी रात्री एक वाजता गाडीनं विमानतळावर पोहोचले होते. पण कॉर्डिनेशन व्यवस्थित न झाल्यानं या लोकांना विमानतळाच्या आत प्रवेश मिळू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्राशिवाय काही तालिबान आले आणि त्यांनी लोकांना मारहाण केली. त्या व्यक्तीने सांगितले की, मी आणि माझी पत्नी कारमधून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झालो. तसंच काही लोकांनीही कारमधून उडी मारली. मात्र अन्य लोकांचं काय होईल हे सांगू शकत नाही. रक्षाबंधनावर सावट, लाचखोर डॉ. झनकरांमुळे 18 हजार कुटुंब आर्थिक संकटात मुल्ला बरदार काबूलला पोहोचला तालिबानचा सहसंस्थापक सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी काबूलला पोहोचला आहे. मुल्ला अब्दुल गनी बरदार काबूलमधील जिहादी नेते आणि राजकारणी लोकांची भेट घेईल. अलीकडेच तालिबान नेत्यांनी हमीद करजई, अब्दुल्ला अब्दुल्ला यांचीही भेट घेतली.