JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Afghanistan Crisis: युद्धभूमीतून परतूनही चिमुकल्यांचं हास्य हटलं नाही; निरागस भावंडाचा VIDEO व्हायरल

Afghanistan Crisis: युद्धभूमीतून परतूनही चिमुकल्यांचं हास्य हटलं नाही; निरागस भावंडाचा VIDEO व्हायरल

रक्षाबंधणाच्या शुभदिनी सोशल मीडियावर एक अफगाण चिमुकल्या बहिण भावाचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक चिमुकली आपल्या भावाचे मुके घेताना दिसत आहे.

जाहिरात

रक्षाबंधणाच्या शुभदिनी सोशल मीडियावर एक अफगाण चिमुकल्या बहिण भावाचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 22 ऑगस्ट: आज भारतात सर्वत्र रक्षाबंधण साजरा केला जात आहे. बहिण भावाच्या अतूट प्रेमाचा धागा अनेक भावांनी आपल्या हातात बांधून घेत मनोमन बहिणीच्या रक्षणाची शपथही घेतली आहे. याच शुभदिनी सोशल मीडियावर एक अफगाणी चिमुकल्यांचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक चिमुकली आपल्या भावला मुके घेताना दिसत आहे. खरंतर, धगधगत्या अफगाणिस्तानातून भारतात आल्यानंतर डोक्यावर अनेक समस्यांचा डोंगर उभा असताना, ही चिमुकली भावंडं मात्र आपल्याच जगात मग्न आहेत. त्यांना आसपास घडणाऱ्या मृत्यू तांडवचा आणि दहशतीचा पूर्णपणे विसर पडला आहे. खरंतर तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून देशात हाहाकार माजला आहे. लाखो नागरिकं आपलं घर सोडून जीव मुठित धरून अन्य देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जीव वाचवून पलायन करत असताना, अनेकांना मृत्यूनंही गाठलं आहे. अफगाणिस्तानातील बिकट परिस्थितीचं वर्णन करणारे हजारो फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामुळे संपूर्ण जगभर अस्वस्थ करणारं वातावरण तयार झालं आहे. असं असलं तरी काही दृष्ये मात्र जगण्याचा एक नवा दृष्टीकोन निर्माण करत आहेत.

संबंधित बातम्या

हेही वाचा- अफगाणिस्तानच्या महिला पत्रकाराचा जीव धोक्यात; मदतीसाठी भारताकडे धाव, म्हणाली… भारतानं अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम राबवायला सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वायु दलाचं विमान 168 प्रवाशांना घेऊन नुकतंच भारतात आलं आहे. या 168 जणांमध्ये एक चिमुरडा आणि त्यांचं कुटुंबही होतं. अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या या चिमुकल्या भावंडांच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. हेही वाचा- म्हणून हा ब्रिटीश नागरिक अफगाणिस्तान सोडायला नाही तयार; कारण वाचून वाटेल अभिमान या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक आई आपल्या काही महिन्यांच्या बाळाला मांडीवर घेऊन बसली आहे. यावेळी त्याची बहिण या बाळाचे मुके घेत आहे. यावेळी ही चिमुकली आपल्या लहान भावालाही मुका घेण्यास लावत आहे. युद्धभूमीतून परतल्यानंतर सुखावणारं हे दृष्य पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटत आहे. भारतीय हवाई दलाचं सी – 17 हे विमान 168 प्रवाशांना घेऊन काबूलहून भारतातील गाझियाबाद विमानतळावर पोहचलं आहे. यावेळी अनेक नागरिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. तालिबानच्या दहशतीचा अनेकांनी पाढा वाचून दाखवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या