JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 90% मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या 'या' देशात होते हिंदू परंपरांचे कौतुक, वाचा काय आहे कारण

90% मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या 'या' देशात होते हिंदू परंपरांचे कौतुक, वाचा काय आहे कारण

इंडोनेशिया (Indonesia) हा जगातील असा देश आहे ज्याठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या ही मुस्लिम धर्मीय आहे. याठिकाणी 90 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे. सध्याच्या काळात याठिकाणी हिंदू परंपरांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

जाहिरात

Balinese Hindu worshipers walk during the Tawur Agung ritual ahead of "Nyepi", Bali's Day of Silence and the Hindu New Year, at Prambanan temple in Yogyakarta March 4, 2011. Most Balinese Hindus practice self-reflection by staying home as they observe this quiet holiday. Nyepi falls on March 5, 2011. REUTERS/Dwi Oblo (INDONESIA - Tags: SOCIETY RELIGION) - RTR2JFLR

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जकार्ता, 09 मे : इंडोनेशिया (Indonesia) हा जगातील असा देश आहे ज्याठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या ही मुस्लिम धर्मीय आहे. याठिकाणी 90 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे. मात्र याठिकाणी असणाऱ्या बाली या शहरात अनेक हिंदू नागरिक राहतात तसंच इथे अनेक मंदिर देखील आहेत. इंडोनेशियामध्ये बाली हे असे एकमेवर बेट आहे, जिथे हिंदू बहूसंख्यांक आहेत. बालीमधील नवीन वर्ष देखील (Bali New Year) शक संवत् पंचांगानुसार ठरते, जे चंद्राच्या गतीवर आधारित आहे. शक राजवंशाची स्थापना इ.स. 78 मध्ये भारतीय राजा कनिष्क यांनी केली होती. हिंदू प्रचारकांनी हा शक राजवंश जावापर्यंत पोहोचवला आणि त्यानंतर बालीपर्यंत त्याचा प्रसार करण्यात आला. BBC च्या एका रिपोर्टनुसार कोरोना संक्रमणाच्या काळात इंडोनेशियातील लोक बालीमधील परंपरांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. विशेषत: बालीमधील ‘मौन दिवस’ खूप चर्चेत आहे. यादिवशी बालीमधील नागरिक 24 तास आपल्या घरी राहतात आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करतात. (हे वाचा- तुम्हाला कोरोनापासून वाचवणारा साबण 4500 वर्षांपूर्वीच असा तयार झाला ) या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जगभरातील लोकं लॉकडाऊनमुळे कंटाळले आहेत, मात्र बालीमधील लोकांसाठी हे फार सामान्य आहे. दरवर्षी ‘न्येपी’च्या दिवशी (मौन पाळण्याचा दिवस) संपूर्ण बेट शांत असतं. कुणाला घराबाहेर पडण्याची परवानगी नसते. यादिवशी घरामध्ये लाइट देखील लावत नाहीत तसंच आग पेटवण्यासही मनाई असते. यादिवशी सर्वांना चिंतन करायचे असल्याने मनोरंजन करून घेण्यास देखील बंदी असते. केवळ दुकाने नाहीत तर 24 तासांसाठी विमानतळ देखील बंद असते.

(हे वाचा- वृद्ध आईला मुलांनी जिवंतपणीच केलं दफन; लोकांनी 3 दिवसांनी कबर खणली आणि… ) न्येपीच्या दिवशी स्थानिक पोलीस रस्त्यांवर पहारा देतात, जेणेकरून कुणी नियम नाही मोडणार. बालीमधील तबनान गावामध्ये राहणारी एक हिंदू महिला श्री दरविती सांगतात की, ‘यावेळी पाळण्यात येणारे मौन ध्यान करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. मी गेल्या 40 वर्षांपासून न्येपी साजरा करते. जसजसे माझे वय वाढते आहे, तसतसे मला याचे महत्त्व अधिक वाटू लागले आहे.’ इंडोनेशियातील या परंपरेबाबत सध्या सोशल मीडियावर देखील काही पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये या परंपरेबाबत कौतुक केले जात आहे. बालीमध्ये देखील सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी न्येपी एक दिवस वाढवण्यात आला होता. संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या