JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Thailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले!

Thailand Cave Rescue : गुहेत अडकलेल्या 6 मुलांना सुरक्षित बाहेर काढले!

अन्य 7 जणांना बाहेर काढण्यासाठी थायलंडमध्ये बचाव कार्य वेगात

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

थायलंड**, 08** जुलै: थायलंडमधील गुहेत अडकलेल्या १२ मुलांना आणि त्यांच्या कोचला बाहेर काढण्याचे बचावकार्यास वेग आलाय. 13 पैकी 6 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकास यश आले असून, फुटबॉल कोचसह अन्य 6 जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर थायलंडमधील थाम लुआँग नामक गुहेत गेल्या आठवडाभरापासून फुटबॉल खेळाडू असलेली ही 12 मुले आणि त्यांचा कोच अडकले आहेत. बचाव पथकात थायलंड नौदलाचे 5 आणि अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, यूकेसह अन्य 10 देशांचे तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. रविवारी 6 मुलांना गुहेतून सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांना यश आले. त्यांना तात्काळ रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी जवळच एक अस्थायी रुग्णालय उभारण्यात आलंय. गुहेतून बाहेर पडण्याची जागा छोटी असल्यामुळे गुहेत अडकलेल्या इतर 7 जणांना काढण्यासाठी आणखी 2 - 4 दिवसांचा अवधी लागू शकतो, असं बचाव पथकाच्या एका अधिकाऱ्यांने स्पष्ट केलंय. ‘वाईल्ड बोअर’ नामक ही फुटबॉल टीम २३ जून रोजी गुहा पाहण्यासाठी गेली होती. गुहेत फार आत गेल्यावर अचानक पावसाचा जोर वाढला आणि त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. मुसळधार पाऊसामुळे गुहेत मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असून, गडद अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत असले तरी, मुलांना अधिकाधिक मानसिक बळ देण्याचे सर्वपरिने प्रयत्न केले जात आहे. दरम्यानच्या काळात बचाव पथकातील माजी अधिकारी सामन कुनोंट यांचा गुहेमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. आम्ही हे कार्य तडीस नेऊ याचा आम्हाला विश्वास आहे असे चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसक ओसातानाकोर्न यांनी स्पष्ट केलंय. संबंधित बातम्या…   Thai Cave Rescue: मुलांना वाचवताना माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू

  आता गुहेतच ‘त्या’ मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण

  थायलंडच्या गुंफेतला थरार! अन्नपाण्याविना 9 दिवस कशी राहिली मुलं?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या