JOIN US
मराठी बातम्या / विदेश / शेवटची आशाही संपली! टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू, 4 दिवसांपासून होते बेपत्ता

शेवटची आशाही संपली! टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू, 4 दिवसांपासून होते बेपत्ता

टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले होते, मात्र तिथे त्यांचा संपर्क तुटला

जाहिरात

पाणबुडीतील पाचही जणांचा मृत्यू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 23 जून : बेपत्ता टायटन पाणबुडीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बेपत्ता टायटन पाणबुडीतील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं जहाज ऑपरेट करणाऱ्या कंपनीने म्हटलं आहे. टायटन पाणबुडीतील पाचही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याला दुजोरा देत पाणबुडी चालवणारी कंपनी OceanGate ने श्रद्धांजली वाहिली आहे. पाणबुडीतील सर्व लोक बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेले होते, मात्र तिथे त्यांचा संपर्क तुटला. 18 जून रोजी OceanGate कंपनीची ही पाणबुडी प्रवासाला निघाली होती, मात्र पहिल्या 2 तासातच संपर्क तुटला होता. टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी 2 दिवसांपासून बेपत्ता; प्रत्येकी 2 कोटी तिकीट, 5 पर्यटकांपैकी एक अरबपती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शोध पथकाला टायटॅनिक जहाजाजवळ हरवलेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. यूएस कोस्ट गार्डच्या म्हणण्यानुसार पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर तज्ज्ञांच्या पथकाने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या एका जहाजात बसलेल्या मानवरहित रोबोटने पाणबुडीचे अवशेष शोधून काढले असल्याचं सांगितलं जात आहे. टायटन पाणबुडीवर बसलेले पाचही लोक सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात OceanGate चे सीईओ स्टॉकटन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि पॉल-हेनरी नार्जियोलेट यांचा समावेश होता. 18 जून रोजी अमेरिकन कंपनी ओशनगेटची ही पाणबुडी टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी प्रवासाला निघाली. या मलब्यापर्यंत पोहोचणं, तिथे फिरणं आणि नंतर परत येणं, असा टायटॅनिकचा टूर सुमारे आठ तास चालतो. मात्र हे पाचही जण परत येऊ शकले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या