अमेरिका 21 जून: अमेरिकन सीमेजवळील मेक्सिकन (America Mexico border) सिटीच्या रेनोसामध्ये वाहनांवर सवार हल्लेखोरांनी नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार (Attacks by armed gunmen) केला. या हिंसक घटनेत कमीत कमी 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, हातात शस्त्रे असलेले हे हल्लेखोर वाहनांवर सवार होते आणि या लोकांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार सुरू केला. 393 कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी साहील जैनच्या नातेवाईकाच्या घरावर छापा या घटनेनंतर एकच गोंधळ उडाल्याचे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे. सुरक्षा दलाला चार संशयितांना ठार करण्यात यश आलं आहे. यामध्ये सीमा पुलाजवळ ठार झालेल्या व्यक्तीचा समावेशही आहे. शनिवारी दुपारी हा हल्ला सुरू झाला. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमध्ये रेनोसाच्या रस्त्यांवर मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी रेनोसाचे महापौर माकी एस्तेर ऑर्टिज डोमिंग्यूझ यांनी ट्विटरवरुन मागणी केली. तामाउलिपासचे राज्यपाल फ्रान्सिस्को ग्रॅसिया कॅबेझा डी वका यांनी रविवारी या घटनेचा निषेध केला आणि ठार झालेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला. हल्ल्यामागील हेतू तपासला जाईल, असे ते म्हणाले. 4 दिवसांपूर्वीच दोन भावांचा मृत्यू; राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा दोघांचा बळी या घटनेनंतर मेक्सिकन आर्मी, नॅशनल गार्ड, राज्य पोलीस आणि इतर एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की त्यांनी दोन महिलांचे अपहरण करुन त्यांना आपल्या गाडीत घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे, तसंच तीन वाहने जप्त केली आहेत.