'या' देशात आहेत सर्वाधिक हॉटेल रूम्स
मुंबई 01 मे : सध्या उन्हाळा सुरू झाला असून, बहुतांश शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्या आहेत. सुट्ट्यांमध्ये अनेक जण देश-विदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. याशिवाय लेजर ट्रॅव्हल, वीकेंड ट्रीप, रोड ट्रिप, स्टेकेशन, वर्केशन आणि ब्लेझर अशा पर्यटनाच्या नवीन पद्धतींचाही ट्रेंड आहे. अशा परिस्थितीत पर्यटन वाढेल, या आशेने हॉटेल इंडस्ट्रीने जोरदार तयारी सुरू केली आहे. जगभरातल्या हॉटेल चेन्स वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास आणि आदरातिथ्य करण्याची तयारी करत आहेत. पर्यटकांची संख्या अधिक असण्याची अपेक्षा लक्षात घेऊन खोल्यांची संख्या वाढविण्याच्या योजना तयार केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्या देशात सर्वाधिक हॉटेल रूम्स आहेत आणि भारतात जास्तीत जास्त हॉटेल्स कुठे आहेत, याची माहिती घेऊया. ‘अमर उजाला’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भारतीय पर्यटन आणि हॉटेल रूम मुंबई हे भारतातलं सर्वांत जास्त हॉटेल रूम्स असलेलं शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरामध्ये सुमारे 13,500 हॉटेल रूम्स आहेत. 2025पर्यंत, मुंबईतल्या हॉटेल रूम्सच्या संख्येत सुमारे 38 टक्के वाढ अपेक्षित आहे. बेंगळुरूमध्ये 14,200 हॉटेल रूम्स आहेत. त्यांची संख्या दोन वर्षांत 22 हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. 2023मध्ये विमान वाहतूक क्षेत्रात 60 टक्के वाढ भारत हा धर्म आणि अध्यात्माशी जोडलेला देश आहे. देशात अनेक धार्मिक स्थळं आहेत. ती पर्यटनाच्या दृष्टीनेही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनासह सुट्टीच्या प्रवासात मोठी वाढ होऊ शकते. धार्मिक प्रवासाव्यतिरिक्त, वीकेंड ट्रिप, रोड ट्रिप, लेजर ट्रिप किंवा ब्लेझर अर्थात बिझनेस प्लस लेजर ट्रॅव्हल यांसारख्या प्रवासाच्या नवीन पद्धती देशात वेगाने वाढत आहेत. भारतातल्या वाढत्या पर्यटनामुळे 2023 या आर्थिक वर्षात भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात 60 टक्के वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय, या हंगामात टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये हॉटेल रूम्सची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. तुमच्याकडील पैशांची प्रत्येक नोट आहे खूप स्पेशल; हे PHOTO पाहून ओळखा ‘ती’ खास गोष्ट शांघाय आणि बीजिंगमध्ये जगातल्या सर्वांत जास्त हॉटेल रूम्स एसटीआर या हॉटेल मार्केट डेटा कंपनीच्या अहवालानुसार, चीनमधली शांघाय आणि बीजिंग ही जगातल्या सर्वाधिक हॉटेल रूम्स असलेली शहरं आहेत. शांघायची लोकसंख्या 26 दशलक्ष आहे. तिथे 13 लाख 46 हजार हॉटेल रूम्स आहेत. बीजिंगची लोकसंख्या 22 दशलक्षांहून अधिक आहे. तिथे 3 लाख 23 हजार 500 हॉटेल रूम्स आहेत. लंडन दुसऱ्या क्रमांकावर चीननंतर सर्वाधिक हॉटेल रूम्स असण्याच्या बाबतीत लंडनचा दुसरा क्रमांक लागतो. तिथे सध्या 1 लाख 55 हजार 600 हॉटेल रूम्स आहेत. 2025पर्यंत लंडनमधल्या हॉटेल रूम्सची संख्या 18 टक्क्यांनी वाढून 1 लाख 83 हजार 608 होण्याची शक्यता आहे.