प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 9 फेब्रुवारी : तुमच्यापैकी अनेकांना प्रवासाची आवड असेल. ज्यांना प्रवासाची फार आवड नाही ते देखील वर्षांतून किमान एकदा कुठेतरी फिरायला जातात. प्रवास करणं पूर्वी इतकं अवघड राहिलेलं नाही. एअरबीएनबी आणि होमस्टेच्या सुविधांमुळे प्रवासाची पद्धत कायमची बदलली आहे. या सुविधांमुळे आपल्याला ऑफबीट ठिकाणंदेखील एक्सप्लोर करता येतात. एखाद्या ठिकाणी राहून आपल्याला स्थानिक नागरिकांप्रमाणे सुट्टीचा आनंद घेता येतो. मात्र, राहण्याच्या ठिकाणी यजमानांनी छुपे कॅमेरे लावल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रवासी आता सुट्टीतील घरांचे बुकिंग करण्यापासून सावध झाले आहेत. हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्येही गोपनीयतेचा भंग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कॅमेऱ्यांचे आकार लहान होत गेले आहेत तसतसे हेरगिरी होण्याची शक्यता जास्त वाढली आहे. काही टिप्सच्या आधारे तुम्ही तुमच्या खोलीतील छुपा कॅमेरा शोधू शकता. 1. मोबाईल फ्लॅश लाईट: बहुतेक कॅमेरा लेन्स, मग त्या कितीही लहान असल्या तरी त्यावरून प्रकाश परावर्तित होतो. साहजिकच छुपा कॅमेरादेखील प्रकाश परावर्तित करतो. खोलीतील छुपा कॅमेरा शोधण्यासाठी अगोदर घरातील सर्व दिवे बंद करा आणि तुमचा स्मार्टफोनचा फ्लॅशलाइट सुरू करा. तुम्हाला एखाद्या ठिकाणी रिफ्लेक्शन दिसल्यास, तुम्ही त्याठिकाणाची अधिक पाहणी करून लपवलेला कॅमेरा शोधू शकता. हे ही पाहा : हे ही वाचा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय 2. डोळ्यांनी आणि हातांनी तपासणी करा: हॉटेलच्या खोलीची तपासणी करताना तुमची निरीक्षण कौशल्यं वापरा. खोलीतील गॅझेट्स विचित्र पद्धतीनं ठेवल्या आहेत असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला अधिक सतर्क राहावं लागेल. खोल्या आणि बाथरुममधील स्मोक डिटेक्टरमध्ये छुपे कॅमेरे असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्याकडे अधिक लक्ष द्या. तसेच, भिंतीची सजावट, इलेक्ट्रिकल आउटलेट्स, टिश्यू बॉक्स, वॉल सॉकेट्स, डेस्क प्लांट्स आणि एअर फिल्टर उपकरणांची देखील तपासणी करा. 3. संशयास्पद उपकरण झाकून ठेवा: तुम्हाला तुमच्या खोलीत एखादं संशयास्पद उपकरण आढळल्यास आणि ते कशासाठी आहे, त्यांचा वापर कशासाठी होतो हे तुम्हाला माहिती नसल्यास ते डिव्हाइस अनप्लग करून टॉवेलनं झाकून टाकलं पाहिजे. तुम्ही एखाद्या ड्रॉवरमध्येदेखील हे डिव्हाइस ठेवून देऊ शकता. 4. स्पाय कॅमेरा डिव्हाइस: तुम्ही एक प्रोफेशनल स्पाय कॅमेरा डिव्हाइस खरेदी करू शकता? ऑनलाईन साईटवर या पद्धतीची उपकरणं मिळतील. बग डिटेक्टरच्या माध्यमातून तुम्ही खोली स्वीप करू शकता. या उपकरणांचं नियमित ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पुनरावलोकन केले जात नसलं तरी, छुपा कॅमेरा शोधण्याचा ते एक उत्तम मार्ग असू शकतात. खासकरून जर तुम्ही सातत्यानं प्रवास करत असाल आणि बाहेर राहत असाल तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
5. मोबाईल अॅप : तुमच्या खोलीत कोणताही छुपा कॅमेरा तुम्हाला आढळला नाही तरी देखील तुम्हाल भीती वाटत असेल तर तुम्ही एखाद्या अॅप्लिकेशनची मदत घेऊ शकता. डिडेक्टिफाय आणि रडारबोट यासारखी अॅप्लिकेशन्स तुम्ही मोबाईल फोनवर डाउनलोड करू शकता. छुपे कॅमेरे शोधणारे बरेच अॅप फ्री आहेत.