JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Youtube चं नवं फीचर; आता युट्युबवर आपल्या भाषेत सर्च करता येणार Video

Youtube चं नवं फीचर; आता युट्युबवर आपल्या भाषेत सर्च करता येणार Video

युजर्स प्राधान्याने आपल्या स्थानिक भाषेचा (Local Language) आधार घेऊन व्हिडीओ (Video) शोधतील तेव्हा त्यांना भाषांतरित शीर्षकांनुसार हवा असलेला कंटेंट लोकप्रिय चॅनेल्सवर दिसू शकेल. सध्या युट्युबवर इंग्रजी भाषेत सर्च केल्यानंतर स्थानिक भाषेतील कंटेंट दिसतो, परंतु त्यात अचूकता नसते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 मे : युट्युब (Youtube) एका नव्या फीचरची चाचणी करत आहे. या फीचरमुळे व्हिडीओचं शीर्षक, वर्णन, मथळे आदी गोष्टी ऑटोमॅटिक मूळ भाषेत भाषांतरित (Translate) होऊ शकणार आहेत. युट्युब वेब आणि अ‍ॅपवर सध्या इंग्रजी भाषेतील मजकूर फक्त पोर्तुगीज भाषेत भाषांतरित होतो. याचं फंक्शन नेमके कसं असेल हे अद्याप अस्पष्ट आहे. युजर्स प्राधान्याने आपल्या स्थानिक भाषेचा (Local Language) आधार घेऊन व्हिडीओ (Video) शोधतील तेव्हा त्यांना भाषांतरित शीर्षकांनुसार हवा असलेला कंटेंट लोकप्रिय चॅनेल्सवर दिसू शकेल. सध्या युट्युबवर इंग्रजी भाषेत सर्च केल्यानंतर स्थानिक भाषेतील कंटेंट दिसतो, परंतु त्यात अचूकता नसते. अँड्रॉइड पोलिसच्या वृत्तानुसार, युट्युब सध्या या फीचरची तपासणी करत असून काही मोजक्याच युजर्सला या फीचरचा अ‍ॅक्सेस (Feature Access) देण्यात आला आहे. या फीचरच्या माध्यमातून अनेक भाषांचा सपोर्ट मिळू शकणार आहे. मात्र युट्युबने अद्याप मूळ वर्णमालेचा (Parent Alphabet) तपशील शेअर केलेला नाही. अहवालातील ठळक नोंदीनुसार, हे नवीन फीचर गुगल ट्रान्सलेशनचा समावेश असणाऱ्या वेब इंटरफेस आणि मोबाईल अ‍ॅपवर भाषांतर पॉप अप (POP-UP) च्या माध्यमातून वापरता येणार आहे. या पॉपअपवर टॅप किंवा क्लिक केल्यानंतर आपोआप आपल्या मूळ भाषेमध्ये व्हिडीओ शीर्षक, वर्णन आणि मथळे भाषांतरीत होणार आहेत. याव्यतिरिक्त कंपनी अनेक भाषांमधील ऑटो कॅप्शनसाठी सपोर्ट देण्याबाबतही तपासणी करत आहे. जरी हा अपडेट फार भरीव नसला, तरी इंग्रजी भाषिक नसलेले 2 अब्ज युजर्स दरमहा हा प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात वापरतात, त्यामुळे हे फीचर त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्या युट्युबचे युजर्स गुगल क्रोमच्या माध्यमातून गुगल ट्रान्सेलटचा (Google Translate) वापर करत टायटल्सचे भाषांतर करत आहेत.

(वाचा -  सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या )

दरम्यान,चॅनेल्सवरील संभाव्य अटॅक टाळण्यासाठी, तसंच त्यांच्या व्हिडीओंना नकारात्मक वोटिंग मिळू नये यासाठी डिसालाईक हा पर्याय काढून टाकण्याबाबत एका प्रयोगावर काम सुरु असून, त्यास युट्युबने दुजोरा दिला आहे. याबाबत कंपनीने गेल्या महिन्यात एक ट्विट केलं होतं, त्यात काही निर्मात्यांना आपल्या कंटेंटसाठी नकारात्मक पसंतीचा सामना करावा करावा लागतो.

(वाचा -  Google Map द्वारे शोधा हरवलेला स्मार्टफोन; अशी होईल मदत )

अनेक कंटेंट निर्मात्यांविरोधात डिसलाईक मोहीम (Dislike Campaign) चालवली जाते, त्यामुळे जरी अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला तरी तो अन्य युजर्सला दिसणार नाही, यासाठी नव्या प्रयोगावर काम सुरू असल्याचं म्हटलं होतं. अंतिम युजर किंवा प्रेक्षकास एखादा व्हिडीओ आवडला किंवा आवडला नसेल तर तो त्याची प्रतिक्रिया देईल आणि याची प्लॅटफॉर्मवरील शिफारशींसाठी मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या