नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : शाओमी (Xiaomi) स्मार्टफोन जगात मोठा धमाका करणार आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, शाओमी आपल्या नव्या स्मार्टफोन Xiaomi 12 वर काम करत आहे. शाओमीच्या या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे असण्याचा दावा करण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह, एक 50 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल आणि आणखी एक 50 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स सामिल असल्याची माहिती आहे. 5x पेरिस्कोप लेन्स - डिजीटल चॅट स्टेशननुसार फोनमध्ये दिला जाणारा 50 मेगापिक्सल टेलिफोटो सेंसर 5x पेरिस्कोप लेन्ससह असेल. याआधी कंपनीने Mi 11 Ultra मध्ये 48 मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स दिली होती. परंतु Xiaomi 12 फोन 50 मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्ससह असणारा पहिला स्मार्टफोन असेल. Mi 11 Ultra मध्ये मिळणारे इतर दोन कॅमेरे 50 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स आणि 48 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स सामिल आहे.
Xiaomi 12 अद्याप डिझाइन वेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे. परंतु लीक रिपोर्ट्सनुसार, हा फोन LPDDR5X मेमरीसह येईल. LPDDR5X ची खास बाब म्हणजे हा 6400Mbps ते 8533Mbps पर्यंतचा डेटा ट्रान्सफर स्पीड ऑफर करतो.
यादरम्यान, विबोवर Xiaomi 12 चा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यात फोनचा बॅक पॅनल कंपनीने खास डिझाइन कॅमेरा मॉड्यूल ऑफर करण्याची माहिती आहे. हा फोटो फॅन-मेड असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे या फोनच्या मॉडेलबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. फोनच्या लाँचिंगबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी फोन यावर्षी लाँच केला जाऊ शकत असल्याचा अंदाज आहे.