नवी दिल्ली, 19 मार्च : Xiaomi ने कंज्यूमर्स इलेक्ट्रॉनिक्स सेक्शनमध्ये आपलं नवं प्रोडक्ट लाँच केलं आहे. कंपनीने क्राउडफंडिंग अंतर्गत नवा ब्लेडलेस फॅन लाँच केला आहे. हा फॅन एयर प्यूरिफायरही आहे. Xiaomi MIJIA ब्रँड अंतर्गत हा फॅन (Bladeless Purification Fan) लाँच केला आहे. कंपनीने MIJIA Smart Bladeless Purification Fan लाँच केला आहे. हा फॅन सध्या चीनमध्ये लाँच झाला असून याची भारतीय रुपयानुसार किंमत 19100 रुपये आहे.
काय आहेत फीचर्स - MIJIA च्या स्मार्ट ब्लेडलेस प्यूरिफिकेशन फॅनमध्ये टू इन वन प्यूरिफिकेशन सायकल डिझाइन मिळतं. हा फॅन 80 ते 90 नॅनोमीटर पार्टिकल 99.96 टक्क्यांपर्यंत फिल्टर करू शकतात. यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल कोटिंग देण्यात आलं आहे. अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल कोटिंगमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस इनअॅक्टिव्ह होतात. यामुळे इनडोअर बॅक्टेरियल पॉल्यूशन कमी होतं.
स्मार्ट ब्लेडलेस प्यूरिफिकेशन फॅनच्या मदतीने 10 मीटरपर्यंतचा एरिया कव्हर करता येतो. यात 15.5 ms मॅक्सिमम विंड स्पीड आणि 1700 मीटर क्यूब ताशी एयर वॉल्यूम मिळतो. या डिव्हाइसमध्ये 5 एयर सप्लाय अँगल देण्यात आले आहेत. यात Impeller डिझाइन मिळतं, त्यामुळे फॅनचा आवजही कमी येतो.
MIJIA Smart Bladeless Purification Fan मध्ये युजर्सला बिल्ट-इन टेम्परेचर किंवा ह्यूमिडिटी सेंसर मिळतो. त्यासह डिव्हाइसमध्ये PM 2.5 सेंसरही देण्यात आला आहे. स्मार्ट ब्लेडलेस फॅन MIJIA App सह कनेक्ट करता येतो. तसंच XiaoAI सह जोडता येतो. या प्रोडक्टमध्ये App आणि Voice Control सपोर्टही मिळतो. या फॅनसह एक रिमोटही दिला जातो, याच्या मदतीने फॅन कंट्रोल करता येऊ शकतो.