नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : जर तुम्हीही स्मार्टफोनवर (Smartphone) स्क्रीन गार्ड (Screen Guard) लावत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्क्रीन गार्ड लावल्यानंतर आपला फोन सुरक्षित असल्याचं वाटतं. परंतु हेच सत्य नाही. स्क्रीन गार्डचा चुकीचा वापर करणं नुकसानकारक ठरू शकतं. जर तुम्ही थर्ड पार्टी स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करत असाल, तर हे स्मार्टफोनसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अनेकदा कॉलिंगवेळी समस्या येतात. अशावेळी युजरला फोन खराब झाल्याचं वाटतं. परंतु फोन योग्यरित्या न चालण्यामागे स्क्रीन गार्डचा चुकीचा वापर हेदेखील कारण असू शकतं. काय आहे कारण - एका रिपोर्टनुसार, मॉर्डन स्मार्टफोनच्या डिस्प्लेखाली दोन सेंसर Ambient Light सेंसर आणि Proximity सेंसर लपलेले असतात. हे दोन्ही सेंसर दिसत नाहीत, जे फोन स्क्रीनच्या उजव्या बाजूला रिसिव्हरजवळ असतात. अशावेळी युजर्स स्क्रीन सुरक्षित ठेवण्यासाठी फोनवर स्क्रीन गार्ड लावतात, त्यावेळी तो सेंसर ब्लॉक होतो. यामुळे स्क्रीन नॉन रिअॅक्टिव्ह होते. यामुळे स्मार्टफोनवर फोन येणं बंद होतं. तसंच थर्ड पार्टी स्क्रीन गार्डच्या वापरामुळे अनेकदा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर योग्यरित्या काम करत नाही.
Ambient Light आणि Proximity सेंसरचा वापर काय? Ambient Light फोनच्या लाईटला उन्हाच्या लाईटप्रमाणे आपोआप वाढवतो. जर फोन एखाद्या कमी उजेड असेलल्या ठिकाणी आहे, तर अशावेळी फोनची लाईट आपोआप कमी होते. तर Proximity Mobile सेंसरमुळे फोन आपल्या कानाजवळ घेऊन गेल्यानंतर त्याची ही लाईट बंद होते आणि पुन्हा फोन कानापासून दूर केल्यानंतर लाईट सुरू होते. त्यामुळे चांगलं स्क्रीन गार्ड वापरणं गरजेचं आहे. तसंच चुकीच्या पद्धतीने लावलेल्या स्क्रीन गार्डमुळे स्मार्टफोन अनलॉक होण्यासह समस्या येतात. फोन अतिशय लेट अनलॉक होतो.
स्क्रीन गार्ड नुकसानापासून वाचण्यासाठी काय कराल? स्क्रीन गार्ड लावायचं असल्यास, एखाद्या ब्रँडेड स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करावा. तसंच ज्या कंपनीचा स्मार्टफोन आहे, त्याच ब्रँडचा स्क्रीन प्रोटेक्टर वापरावं. कारण स्मार्टफोन कंपन्यांना सेंसर कोणत्या ठिकाणी प्लेस केला आहे, याची माहिती असते. स्मार्टफोन निर्माता कंपन्या त्याच हिशोबाने स्क्रीन प्रोटेक्टरची निर्मिती करतात.