जगभरातल्या महागड्या आणि वेगवान कार,
नवी दिल्ली, 28 जुलै: पुढे चोरांची कार चाललीय आणि पोलीस पाठीमागून त्यांच्या जीपमधून त्यांचा पाठलाग करत आहेत, असं दृश्य जुन्या सिनेमांमध्ये दिसायचं. काही वेळा चोर पळून जाण्यात यशस्वी ठरलेले दिसायचे. गेल्या काही वर्षांत वाहन उद्योगात मोठी क्रांती झाली आहे. अनेक शक्तिशाली आणि विविध फीचर्स असलेल्या कार्स आणि अन्य वाहनं रस्त्यांवर आली आहेत. अशा स्थितीत चोर किंवा संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात यशस्वी व्हायचं असेल, तर पोलिसांकडेही अत्याधुनिक, शक्तिशाली वाहनं असण्याला पर्याय नाही. गुन्हेगाराकडे सुपरकार असेल आणि पोलिसांकडे सर्वसाधारण वाहन असेल, तर साहजिकच गुन्हेगार निसटून जाणार. याचाच विचार करून जगभरातल्या अनेक देशांत पोलिसांच्या ताफ्यात अत्यंत शक्तिशाली कार्सचा समावेश करण्यात आला आहे. अनेक देशांच्या पोलीस वाहनांत लॅम्बॉर्घिनी, फेरारी आदी महागड्या आणि शक्तिशाली कार्सचाही समावेश आहे. पोलिसांकडे उत्कृष्ट ड्रायव्हिंग कौशल्य असावं लागतंच; पण त्यांना वेगवान, शक्तिशाली आणि सुरक्षित कार्सची गरज असते. ती गरज भागवणाऱ्या कार्स अनेक देशांतल्या पोलिसांकडे आहेत. दुबईत जगातल्या सर्वांत महागड्या पोलीस कार्स आहेत. अमेरिकी पोलिसांकडे अनेक साध्या दिसणाऱ्या, पण शक्तिशाली कार्स आहेत. इटलीत पोलिसांकडे अनेक क्लासिक सुपरकार्स आहेत. अशा महागड्या आणि शक्तिशाली पोलीस कार्सची माहिती घेऊ या. ‘स्टार्स इन्सायडर’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 1 लाखांचं डाळिंब चोरीला, चोरांचा प्रताप पाहून शेतकऱ्यानं लावला डोक्याला हात 1. अमेरिका - फोर्ड पोलीस इंटरसेप्टर : फोर्ड टॉरस कारला 3.5 लिटर V6 इंजिन असून, 131 मैल प्रति तास (210 किमी प्रति तास) एवढा कमाल वेग ही कार गाठू शकते. शेवरोले कॅमारो एसएस : अमेरिकेतल्या डेन्व्हर शेरीफ डिपार्टमेंटकडे ही शेवी कॅमारो कार आहे. हिचं V8 इंजिन जबरदस्त शक्तिशाली आहे. डॉज चॅलेंजर : ही मीन इंटरसेप्टर कारही अमेरिकी पोलिसांकडे आहे. तिला शक्तिशाली V8 इंजिन असून, त्याची क्षमता 485 हॉर्सपॉवर एवढी आहे. डॉज चार्जर पर्सूट : ही कारही अमेरिकन पोलिसांकडे असून, व्हर्जननुसार या कारला 3.6 लि V6 किंवा 5.7 V8 इंजिन असू शकतं. तसंच, इंजिनची क्षमता 292 किंवा 370 हॉर्सपॉवर असू शकते. 2. दुबई - बुगॅटी व्हेरॉन : ही जगातली सर्वांत महागडी पोलीस कार दुबई पोलिसांकडे आहे. त्या कारच्या इंजिनची क्षमता तब्बल 1001 हॉर्सपॉवर एवढी आहे. लॅम्बॉर्घिनी अॅव्हेंटेडॉर : दुबई पोलिसांच्या सुपरकार्सच्या ताफ्यात ही कारही आहे. बेंटली बेंटाग्या : ही टॉप लक्झरी एसयूव्हीदेखील दुबई पोलिसांच्या पोलिस कार्सच्या ताफ्यात आहे. फेरारी ला फेरारी : ही 950 हॉर्सपॉवर क्षमतेचं इंजिन असलेली बीस्टसुद्धा दुबई पोलिसांकडे आहे. बेंटली कॉन्टिनेन्टल जीटी : ही कारदेखील दुबई पोलिसांकडे आहे. 3. ऑस्ट्रिया - पोर्श्चे 911 कॅरेरा : ही क्लासिक स्पोर्ट्स कार ऑस्ट्रियातल्या पोलिसांकडे असून, तिचा कमाल वेग ताशी 186 मैल अर्थात ताशी 300 किलोमीटर्स एवढा प्रचंड आहे. 5. यूके - मॅक्लारेन MP4-12C : 616 हॉर्स पॉवरचं इंजिन असलेली ही कार शून्यापासून ताशी 97 किलोमीटर्सपर्यंतचा वेग अवघ्या 3.2 सेकंदांत घेऊ शकते. या सुपरकारच्या तावडीतून चोर सुटणं अशक्यच. एरियल अॅटम : केवळ 612 किलो वजन असलेली गो-कार्टसारखी दिसणारी ही कारही ब्रिटिश पोलिसांकडे आहे. तिचं इंजिन 350 हॉर्सपॉवर क्षमतेचं आहे. त्यामुळे ती अवघ्या 2.5 सेकंदांत शून्यापासून ताशी 97 किलोमीटर्सपर्यंतचा वेग गाठू शकते. लोटस इव्होरा : 3.5 लिटर V6 इंजिन असलेल्या या कारची इंजिनक्षमता 280 हॉर्सपॉवर असून, तीदेखील ब्रिटिश पोलिसांकडे आहे. 6. इटली - फोर्ड मस्टँग : इटालियन पोलिसांकडे ही क्लासिक अमेरिकन मसल कार आहे. अमेरिकेसह, जर्मन पोलिसांचीही ही आवडती कार आहे. फेरारी 458 : मिलान (इटली) पोलिसांकडे यातली एक कार असून, तिचं 4.5 लि. V8 इंजिन 570 हॉर्सपॉवर क्षमतेचं आहे. लॅम्बॉर्घिनी हुराकॅन : V-10 इंजिन असलेल्या या कारची क्षमता 600 हॉर्सपॉवरहून अधिक आहे. शून्यापासून ताशी 97 किलोमीटर्सचा वेग अवघ्या 2.8 सेकंदांत गाठू शकणारी ही कार इटालियन पोलिसांकडे आहे. लॅम्बॉर्घिनी गॅलार्डो LP560-4 पोलिझिया : V10 इंजिन असलेल्या या कारची इंजिनक्षमता 560 हॉर्सपॉवर असून, तिचा कमाल वेग ताशी 325 किलोमीटर्स एवढा आहे. ही कारदेखील इटलीतल्या पोलिसांकडे आहे. 7. मलेशिया - मित्सुबिशी लान्सर : ही ऑल व्हील ड्राइव्ह कार असून, 300हून अधिक हॉर्सपॉवर क्षमतेचं इंजिन या कारला आहे. 8. इंडोनेशिया - मित्सुबिशी लान्सर : ही रेसिंग प्रकारची कार असून, दहा पिढ्या ही कार आयकॉनिक आहे. 9. कतार आणि ऑस्ट्रेलिया - पोर्श्चे पॅनामेरा : या कारचा कमाल वेग ताशी 161 मैल (259 किलोमीटर्स) असल्याने ती खूप शक्तिशाली आहे. 10. पोर्तुगाल - ऑडी R8 : पोर्तुगीज पोलिसांकडे असलेल्या या कारला 4.2 लि. V8 इंजिन असून, त्याची क्षमता 420 हॉर्सपॉवर एवढी आहे. 11. यूके आणि ऑस्ट्रेलिया - लोटस एक्सिज क्रूझर : 220 हॉर्सपॉवर क्षमतेचं इंजिन असलेल्या या कारचा कमाल वेग ताशी 225 किलोमीटर्स आहे. 12. नेदरलँड्स - स्पायकर सी8 : फ्लेव्होलँड पोलिसांकडे स्पायकर या डच कंपनीची सुंदर सुपरकार आहे. V8 इंजिन असलेली ही कार ताशी 300 किलोमीटर्सपेक्षा अधिक वेगाने धावू शकते.