नवी दिल्ली, 4 एप्रिल : वन प्लस फोनच्या (Oneplus) काही मॉडेलमध्ये ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा Oneplus Nord 2 स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाल्याचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. Oneplus Nord 2 मध्ये फोन कॉल सुरू असताना अचानक ब्लास्ट होऊन जखमी झाल्याचा दावा यूजरने केला आहे. ट्विटरवर याबाबत फोटो आणि माहिती शेअर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर यूजरने सांगितलं की, त्यांचा भाऊ फोनवर बोलत असताना फोनमध्ये ब्लास्ट झाला. ब्लास्टमुळे भावाच्या हातावर आणि चेहऱ्यावर काही भागात जखमा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. याबाबत कंपनीने उत्तर देत प्रकरणाची चौकशी करत असल्याचं म्हटलं आहे.
ट्विटर यूजरने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. युजरने हा फोन Oneplus Nord 2 असल्याचं म्हटलं आहे. अद्याप फोनमध्ये ब्लास्ट झाल्याच्या घटनेचं कारण समजू शकलेलं नाही. फोटोमध्ये फोन ओळखणंही कठीण होत आहे.
वनप्लस कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Oneplus Nord 2 ब्लास्टचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही काही यूनिट्समध्ये ब्लास्टच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये वनप्लस नॉर्ड 2 मध्ये ब्लाट झाला होता. 2021 जुलैमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. परवडणाऱ्या किमतीत हा फोन उपलब्ध करण्यात आला होता.