JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp Update: एकाहून अधिक लोकांना फॉर्वर्ड करता येणार नाही मेसेज, नवं फीचर असं करेल काम

WhatsApp Update: एकाहून अधिक लोकांना फॉर्वर्ड करता येणार नाही मेसेज, नवं फीचर असं करेल काम

कंपनीने आधीच App वर तुम्ही किती वेळा चॅट फॉर्वर्ड करू शकता हे रिस्ट्रिक्टेड केलं आहे. परंतु नव्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या काळात ही लिमिट आणखी कमी केली जाऊ शकते.

जाहिरात

कनेक्ट करण्यासाठी अकाउंट सिलेक्ट करा आणि Done वर क्लिक करा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 मार्च : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. या एकाच प्लॅटफॉर्मवर फोटो, व्हिडीओ, फाइल्स, चॅट, ऑडिओ-व्हिडीओ कॉल, पेमेंट्स अशा गोष्टी मिळत असल्याने हे जगभरात विश्वासार्ह, पॉप्यलर App ठरलं आहे. WhatsApp आपल्या युजर्सला सतत नवे अपडेट देत असतं. आता कंपनी App च्या फॉर्वर्ड मेसेज सर्विसवर काम करत आहे. WhatsApp आपल्या मेसेज फॉर्वर्ड सर्विसची लिमिट सेट करत आहे. आता युजर्स एका वेळी केवळ एका युजरलाच मेसेज फॉर्वर्ड करू शकेल. हे पाऊल कंपनीने App च्या माध्यमातून चुकीची माहिती आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी उचललं आहे. कंपनीने आधीच App वर तुम्ही किती वेळा चॅट फॉर्वर्ड करू शकता हे रिस्ट्रिक्टेड केलं आहे. परंतु नव्या रिपोर्टनुसार, येणाऱ्या काळात ही लिमिट आणखी कमी केली जाऊ शकते. WhatsApp लवकरच मेसेज एकाहून अधिक ग्रुममध्ये फॉर्वर्ड करण्यावर बंदी आणू शकेल.

हे वाचा -  आता अधिक सुरक्षित होणार WhatsApp, Cyber Fraud ची एक्सटेंशनद्वारे मिळेल माहिती

WABetainfo ने एक रिपोर्ट जारी केला होता. या रिपोर्टमध्ये इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आता सर्व मेसेज फॉर्वर्ड करण्याची लिमिट कमी करणार असल्याचं म्हटलं होतं. या नव्या आणि अपडेटेड फीचरला व्हॉट्सअॅप बीटाच्या बीटा v2.22.7.2 अँड्रॉइड वर्जनमध्ये अपडेट केलं जाईल. मेसेजिंग App व्हॉट्सअॅपवर चुकीचा मेसेज व्हायरल होऊ नये म्हणून युजरला त्यांचा फॉर्वर्ड मेसेज रिव्ह्यू करण्यासाठी आणि चुकीच्या बातमीचा किंवा मेसेजचा प्रसार मर्यादित करण्यासाठी हे नवं अपडेट फायद्याचं ठरणार आहे.

हे वाचा -  WhatsApp वर Dark Mode कसा कराल ऑन-ऑफ, पाहा सोप्या स्टेप्स

नवं अपडेट कसं करेल काम - WhatsApp वर अनेक युजर्स व्हायरल मेसेज एकाच वेळी अनेक ग्रुप चॅटमध्ये फॉर्वर्ड करतात. परंतु आता WhatsApp कडून आधीच एक अलर्ट मेसेज दिसतो आहे. या मेसेजमध्ये ‘फॉर्वर्ड मेसेज एकावेळी केवळ एका ग्रुपमध्येच पाठवता येईल’ असं लिहिलेलं दिसेल. युजर्सच्या मेसेज फॉर्वर्ड करण्याच्या प्रोसेसला अधिक कठीण करण्याचा WhatsApp चा उद्देश आहे. सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये असून रोलआउट बीटामध्ये करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या