कनेक्ट करण्यासाठी अकाउंट सिलेक्ट करा आणि Done वर क्लिक करा.
नवी दिल्ली, 31 जानेवारी: फेसबुकच्या (Facebook) मालकीचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स अपडेट करत असतो. नव्या फीचर्समुळे WhatsApp अधिक सोपं-सोयीचं होतं. आता व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत असून, लवकरच हे लाँच होणार आहे. व्हॉट्सअॅपवर येणारं हे नवीन फीचर फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) शेअर करण्याच्या पद्धतीत मोठा बदल करणार आहे. याबाबत व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने (WABetaInfo) माहिती दिली आहे. अँड्रॉइड (Android) डिव्हाइससाठी व्हॉट्सअॅपवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याच्या पद्धतीत होणाऱ्या बदलांचे संकेत देण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने (WABetaInfo) एक स्क्रीनशॉट शेअर केला असून, त्यात व्हॉट्सअॅपच्या मीडिया पिकर (Media Picker) फीचरचा लूक पूर्णपणे बदलला जाणार असल्याचं दिसून येतं. नवीन व्हॉट्सअॅप मीडिया पिकरमध्ये रिसेंट (Recent) आणि गॅलरी (Gallery) असे दोन टॅब असतील, ज्यामुळे युजर्सना स्टेटस शेअर करणं आणि अपलोड करणं अधिक सोपं जाईल. रिसेंट (Recent) टॅबद्वारे फोनच्या गॅलरीत (Phone Gallery) असलेले नुकतेच क्लिक केलेले फोटो, व्हिडीओ, जीआयएफ (GIF) दिसतील तर गॅलरी टॅबद्वारे (Gallery Tab) फोनमधील अन्य मीडिया फाइल्स दिसतील. व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅप आणि वेब प्रकारात टू-स्टेप वेरिफिकेशन (Two Step Verification) आणण्यासाठीदेखील प्रयत्न करत असल्याचं व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने (WABetaInfo) म्हटलं आहे.
टू-स्टेप वेरिफिकेशन हे फीचर लवकरच अपडेट केलं जाणार असून, टू-स्टेप व्हेरिफिकेशन वेब आणि डेस्कटॉप या दोन्ही प्रकारात सहजपणे कार्यान्वित करता येईल किंवा बंद करता येणार असल्याचं व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने (WABetaInfo) शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरून स्पष्ट झालं आहे. वेब आणि डेस्कटॉप युजर्सना अधिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशानं व्हॉट्सअॅप एका फीचरवर काम करत असून आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड (Android) प्लॅटफॉर्मवर ते आधीपासूनच उपलब्ध आहे.
व्हॉट्सअॅप सर्वत्र टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीने हे नवीन फीचर महत्त्वाचं ठरणार आहे. डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप चॅटचा अॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरणार असून, सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात आहे. लवकरच ते दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी 6 अंकी पीन असेल. तुमचा फोन हरवला किंवा तुम्हाला पीन नंबर आठवत नसेल अशावेळी तुम्ही रिसेट लिंकद्वारे पिन रिस्टोअर करू शकता.