झटक्यात खटका! WhatsApp वर फालतू मेसेज करणाऱ्यांना 30 सेकंदात असं करा ब्लॉक
मुंबई, 26 ऑक्टोबर: व्हॉट्सअॅप हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे, जे तुम्हाला जगभरातील लोकांशी जोडतं. परंतु काही वापरकर्ते इतरांना विनाकारण त्रास देण्यासाठी या अॅपचा गैरवापर देखील करू शकतात. व्हॉट्सअॅपवरील ग्रुप असो किंवा प्रायव्हेट चॅट, स्पॅम मेसेज कोणालाही आवडत नाहीत. मेटा-मालकीचे अॅप तुम्हाला अशा कोणत्याही वापरकर्त्याला ब्लॉक करण्याची परवानगी देते. ब्लॉक केल्यामुळं तुम्हाला त्या संपर्काकडून कोणतेही संदेश प्राप्त होत नाहीत आणि स्पॅम संदेशांपासून मुक्त होण्यास मदत होते. तुम्हाला एखाद्या वापरकर्त्यांकडून किंवा अनोळखी नंबर्सकडून मेसेज येत राहिल्यास आणि तुम्ही त्याला कनेक्ट करू इच्छित नसाल तर व्हॉट्सअॅप तुम्हाला त्यांची तक्रार करण्याची परवानगी देते. जेव्हा तुम्ही रिपोर्ट आणि ब्लॉक फीचर वापरता तेव्हा कंपनी तुम्हाला प्राप्त होणाऱ्या मेसेजबद्दल अलर्ट करते आणि त्यानुसार कारवाई करते. जर नंबर अनेक वेळा नोंदवला गेला तर व्हॉट्सअॅप वापरकर्त्याला अॅप वापरण्यापासून कायमचं ब्लॉक करू शकते. तुम्हाला एखाद्या ज्ञात किंवा अनोळखी वापरकर्त्याकडून काही वाईट संदेश येत असल्यास, तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता आणि त्याची तक्रारही करू शकता. कोणत्याही युजरला रिपोर्ट आणि ब्लॉक कसं करायचं?
अनोळखी वापरकर्त्यांला रिपोर्ट आणि ब्लॉक करा-
तुम्ही एखाद्याला WhatsApp वर रिपोर्ट केल्यानंतर आणि ब्लॉक केल्यानंतर काय होते? तक्रार केलेल्या वापरकर्त्याने किंवा गटाने तुम्हाला पाठवलेले शेवटचे पाच मेसेज कंपनीला मिळतात आणि तुम्ही WhatsApp वर एखाद्याचा रिपोर्ट आणि ब्लॉक करता तेव्हा त्या वापरकर्त्याला तुम्हाला संदेश पाठवण्यापासून प्रतिबंधित केलं जातं. तक्रार केलेल्या वापरकर्त्याला याची सूचना मिळत नाही. ज्या वापरकर्त्याला ब्लॉक केलं गेलं आहे आणि रिपोर्ट केलं आहे तो तुमचे प्रोफाइल पिक्चर, स्टेटस किंवा इतर कोणताही डेटा पाहू शकणार नाही. व्हॉट्सअॅपला रिपोर्ट दिलेला गट किंवा वापरकर्ता आयडी, तुम्हाला संदेश पाठवण्याची वेळ, तसेच संदेशाचा प्रकार (उदा. मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ इ.) देखील सूचित केले जाते. व्हॉट्सअॅप सेवा अटींचं उल्लंघन करणाऱ्या वापरकर्त्यांवर बंदी घातली जाऊ शकते.