JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जुन्या स्मार्टफोनवर बंद होणार whatsapp? जाणून घ्या काय आहे सत्य

जुन्या स्मार्टफोनवर बंद होणार whatsapp? जाणून घ्या काय आहे सत्य

2021 पासून व्हॉट्सअ‍ॅप iPhone च्या जुन्या मॉडेल्समध्ये, अँड्रॉईड 4.0.3 आणि त्याहून जुन्या वर्जन असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करणार नसल्याचं बोललं जात आहे. पण आता चर्चांबाबत खुलासा झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : मागील काही दिवसांपासून इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) काही नव्या फीचर्समुळे, तर काही चर्चांमुळे सतत चर्चेत आहे. काही मीडि-या रिपोर्ट्सनुसार, –2021 पासून व्हॉट्सअ‍ॅप iPhone च्या जुन्या मॉडेल्समध्ये सपोर्ट करणार नसल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय अँड्रॉईड 4.0.3 आणि त्याहून जुन्या वर्जन असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद होणार, तसंच आयओएस 9 (iOS 9) आणि त्याहून जुन्या वर्जनवरही WhatsApp बंद होणार असल्याचीही चर्चा होती. परंतु आता WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार की नाही याबाबत खुलासा केला आहे. WABetaInfo ने WhatsApp जुन्या वर्जनमध्ये बंद होण्याचे दावे फेटाळले आहेत. WABetaInfo व्हॉट्सअ‍ॅपशी जोडलेल्या डेव्हलपमेंट्सवर नजर ठेवतो. त्यांनी एका ट्विटमध्ये, ‘या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे, बाहेर करण्यात आलेले सर्वच दावे खरे नाही. जुन्या आयफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करणार नाही, हा दावा खोटा आहे.’ असं त्यांनी ट्विट करत स्पष्ट केलं आहे.

(वाचा -  20000 रुपये स्वस्त दरात मिळतोय Apple चा हा जबरदस्त iPhone; वाचा काय आहे ऑफर )

व्हॉट्सअ‍ॅपने कोणत्याशी प्लॅटफॉर्मवर, ते काही फोनमध्ये आपली सर्व्हिस बंद करत असल्याचं सांगितलं नाही. व्हॉट्सअ‍ॅपकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

(वाचा -  Instagram चं नवं Vanish Mode फीचर; आता चॅटिंगमध्ये होणार असा बदल )

अँड्रॉईड 4.0.3 आणि आयओएस 9 आणि त्याहून जुन्या वर्जन ऑपरेटिंग सिस्टमवरही व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट करत आहे. कंपनीने असा कोणताही निर्णय घेतल्यास, सर्वात आधी याबाबतची माहिती ग्राहकांना देण्यात येते. त्यामुळे काही जुन्या वर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याऱ्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या