JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Twitter चा पर्याय Koo तसा आता Whatsapp लासुद्धा आला स्वदेशी पर्याय - Sandes

Twitter चा पर्याय Koo तसा आता Whatsapp लासुद्धा आला स्वदेशी पर्याय - Sandes

Whatsapp सारखं एक भारतीय अ‍ॅप विकसित करण्याचं काम सुरू असल्याचे संकेत गेल्या वर्षी केंद्र सरकारने दिले होते. आता सरकारी अधिकारी Sandes app ची चाचपणी त्याच दृष्टीने करत आहेत.

जाहिरात

sandes app

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी: Twitter वर कायदेशीर कारवाईची चाचपणी करत असतानाच मोदी सरकारने त्याला पर्याय म्हणून स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग अॅपचा प्रसार सुरू केला आहे. Koo नावाच्या या made in India मोबाईल अॅप्लिकेशन मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आयटी मंत्रायाने स्वतःचं व्हेरिफाइड अकाउंट उघडलं आहे. एवढंच नाही तर आता Whatsapp लासुद्धा देसी पर्याय आला आहे. Sandesh या app वर  भारत सरकारच्या काही संस्थांनी आणि मंत्रालयानेही अकाउंट उघडलं आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) आणि फेसबुकच्या (Facebook) प्रायव्हसी धोरणांमुळे मोठा गदारोळ माजला होता. अनेकांनी ही माध्यमं न वापरण्याचाही निर्धार केला होता; मात्र नंतर या कंपन्यांनी नरमाईची भूमिका घेतल्याने पुन्हा सारं जवळपास पूर्ववत झालं. तरीही त्या गदारोळामुळे एक गोष्ट उघड झाली. ती म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मेसेजिंग अ‍ॅपला अनेक पर्याय असले, तरी सक्षम भारतीय पर्याय उपलब्ध नाही. आता मात्र ती परिस्थिती बदलत असून, ‘संदेस’ (Sandes)नावाचं एक भारतीय अ‍ॅप (Indian App) विकसित झालं आहे. इंडिया टुडेने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपसारखं एक भारतीय अ‍ॅप विकसित करण्याचं काम सुरू असल्याचे संकेत गेल्या वर्षी केंद्र सरकारने दिले होते. आता ते अ‍ॅप विकसित झालं असून, त्याची प्राथमिक चाचणी करण्याचं काम सरकारी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार, काही मंत्रालयांनी गव्हर्न्मेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टीम (GIMS) हे अ‍ॅप वापरायला आधीच सुरुवात केली आहे. हे अ‍ॅप जीआयएमएस या नावानं ओळखलं जाईल, असं गेल्या वर्षी अनेक वृत्तांत म्हटलं होतं; मात्र आता ते संदेस या नावाने ओळखलं जात आहे.

gims.gov.in या वेबसाइटवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यावर sign-in LDAP, संदेस ओटीपीसह साइन इन, संदेस वेब आदी पर्याय त्यावर देण्यात आले आहेत. त्यापैकी कोणत्याही पर्यायावर टॅप केल्यानंतर एक मेसेज दिसतो, की ही ऑथेंटिकेशनची पद्धत केवळ अधिकृत सरकारी अधिकाऱ्यांसाठीच आहे. हे वाचा - Twitter विरोधी कारवाईसाठी मोदी सरकार सज्ज; स्वदेशी Koo खाती उघडलीसुद्धा! सोशल मीडिया नेटवर्ककडून नियमांचं उल्लंघन होत असेल, अशा माध्यमांतून सरकारी अधिकाऱ्यांना बाहेर काढून, त्यांच्यासाठी अधिकृत देशी पर्याय उपलब्ध करण्याचा विचार करण्यात आला आहे. ‘संदेस’चा वापर सध्या फक्त सरकारी अधिकाऱ्यांपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे; मात्र नंतरच्या टप्प्यात ते सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संदेस (Sandes) हे अ‍ॅप अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही पद्धतींवर उपलब्ध आहे. आधुनिक चॅटिंग अ‍ॅप्सप्रमाणे व्हॉइस आणि डेटा या सुविधा त्यात उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरद्वारे (एनआयसी) हे संदेस अॅप चालवले जाते. सरकारी आयटी सेवा आणि डिजिटल इंडिया इनिशिएटिव्हअंतर्गत असलेल्या कारभाराला साह्य करण्याचं काम एनआयसी करते.

हे देखील वाचा - E aadhar card सह 35 सेवा मिळणार मोबाईलवर #mAadhaar App च्या माध्यमातून

सध्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे (Privacy Policy) उठलेलं वादळ काही काळापुरतं शमलेलं असलं, तरी ते नष्ट झालेलं नाही. त्यामुळे याच काळाचं औचित्य साधून संदेस हे देशी अॅप सादर केलं जातं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या