JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Whatsapp युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फीचर; Create Call Link ने अनेक गोष्टी होणार सोप्या

Whatsapp युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फीचर; Create Call Link ने अनेक गोष्टी होणार सोप्या

WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी आणखी एक नवीन फीचर आणलं आहे.

जाहिरात

whatsapp technology

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑक्टोबर : व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव द्विगुणीत करण्यासाठी एकापेक्षा एक सरस फीचर सादर करत असते. अलीकडेच मेसेजिंग अ‍ॅपच्या ‘Create Call Link’ या फीचरची चर्चा होत आहे. WABetaInfo द्वारे माहिती मिळाली की कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, जे कॉलिंगशी संबंधित आहे. याआधी हे फीचर बीटा स्टेजमध्ये असल्याचे समोर आले होते. आता काही iOS यूजर्सना कॉल लिंक तयार करण्याचे फीचर मिळाले आहे. या फीचरबद्दल वाचल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की कॉलिंग फीचर तर आधीपासूनच होते. मग या फीचरचा उपयोग काय? वास्तविक, या फीचर अंतर्गत, वापरकर्ते व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलसाठी लिंक जनरेट करू शकतील आणि कोणाशीही शेअर करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपचे क्रिएट कॉल लिंक फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना ते अॅपल स्टोअरमध्ये अपडेट करावे लागेल. त्याचे व्हर्जन 22.21.77 आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे, युजर्स कॉल प्रकार निवडू शकतील (मग तो ऑडिओ किंवा व्हिडिओ) आणि नंतर कॉलसाठी लिंक तयार करू शकतील. जेव्हा दोनपेक्षा जास्त लोक सामील होतात तेव्हा तो आपोआप ग्रुप कॉल होईल. वाचा - दिवाळीपासून या मोबाईलवर चालणार नाही व्हॉट्सअॅप, 2 दिवसात मेसेही होणार बंद! तसेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केलेले सर्व कॉल एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील, म्हणजेच कॉलच्या बाहेरील कोणीही संभाषण ऐकू शकणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. वापरकर्ते कॉल लिंक लोकांसोबत शेअर करू शकतात किंवा URL देखील शेअर केली जाऊ शकते.

पायरी 1- सर्व प्रथम, अपडेटेड व्हर्जनमध्ये तुमचे WhatsApp अपडेट करा. पायरी 2- तुमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि ‘कॉल’ टॅबवर जा. पायरी 3- वर दिलेला ‘Create Call Link’ हा पर्याय निवडा. स्टेप 4- या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर, खाली एक पॉपअप येईल. यात तुम्हाला व्हिडिओ किंवा व्हॉईस कॉल करायचा आहे का असे विचारत. पायरी 5- मग तुम्ही लिंक शेअर करू शकता किंवा URL कॉपी करू शकता आणि तुमच्या संपर्कासोबत शेअर करू शकता. लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी URL तयार केल्यावर, ती युनिक, सुरक्षित आणि 22-कॅरेक्टर आयडीवाली असेल. कॉलसाठी लिंक तयार करण्यासाठी, Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांना कॉल टॅबवर जावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या