नवी दिल्ली, 16 डिसेंबर : WhatsApp ने आपल्या पायलट प्रोग्रामअंतर्गत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 500 गावं दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. मेटाचं मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ने बुधावारी ग्रामीण स्मार्टफोन युजर्सला डिजीटल पेमेंटची (Digital Payment) ओळख करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचा हा पायलट प्रोग्राम डिजीटल पेमेंट्स उत्सव (Digital Payment Utsav) कर्नाटक आणि महाराष्ट्रातील 500 गावांना कव्हर करेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. मेसेजिंग App चं उद्दिष्ट या गावातील युजर्सला WhatsApp Pay द्वारे डिजीटल पेमेंट उपलब्ध करुन द्यायचं आहे. भारतात मेटाचा वार्षिक कार्यक्रम त्यांच्या Apps द्वारे सामाजिक - आर्थिक बदल आणि त्याचा समाजावर होणारा सकारात्मक परिणाम दाखवतो.
काय आहे प्रोग्रामचा उद्देश - ग्राउंड लेवलवर डिजीटल पेमेंट सिस्टममध्ये व्यावहारिक बदल घडवून आणणं हा उद्देश आहे. WhatsApp च्या माध्यमातून आर्थिक गती देण्यासाठी कंपनी वचनबद्ध असल्याचं भारतातील WhatsApp प्रमुख अभिजित बोस यांनी सांगितलं. तसंच आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 500 गावांना या पायलट प्रोग्राममध्ये सामिल केलं आहे. पुढे 50 कोटी डिजीटल पेमेंट इकोसिस्टमला जोडण्याचं आमचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले. Meta ची मेसेजिंग कंपनी WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, गावातील किराणा दुकानापासून ते ब्यूटी पार्लरपर्यंत सर्व छोटे आणि मध्यम व्यवसाय आता WhatsApp Pay चा वापर करुन डिजीटल पेमेंट करू शकतात. डिजीटल पेमेंट्स उत्सव पायलट कार्यक्रमाची सुरुवात 15 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात क्याथनाहल्ली गावातून झाली. या गावातील लोकांना डिजीटल पेमेंटबाबत सविस्तर माहिती दिली गेली. त्यांनी UPI द्वारे Sign-up कसं करायचं, UPI Account कसं बनवायचं आणि डिजीटल पेमेंटवेळी कशी सावधगिरी बाळगायची याबाबत माहिती देण्यात आली.