व्हॉट्सअॅपचा सर्व्हर पुन्हा डाउन झाला तर टेन्शन घेऊ नका, मेसेजिंगसाठी वापरा ‘ही’ अॅप्स
मुंबई, 26 ऑक्टोबर**:** जगभरात दोन अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंगपासून इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जात आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की भारतात व्हॉट्सअॅपची सेवा बऱ्याच काळापासून ठप्प आहे. अशा परिस्थितीत एखाद्याला महत्त्वाचे संदेश, व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉलिंग करताना लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत वापरकर्ते व्हॉट्सअॅपशी संबंधित अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. जगभरातील लोक इन्स्टंट मेसेजिंगसाठी इतर कोणत्याही अॅप्सपेक्षा WhatsApp वापरतात. व्हॉट्सअॅप डाऊनमुळे लोकांना त्यांचे महत्त्वाचे मेसेज एकमेकांना पाठवता येत नाहीत. युजर्सला अशा अडचणींचा सामना पुन्हा करावा लागू नये म्हणून मेटा प्रयत्न करत आहेच. परंतु अशी समस्या पुन्हा होणारच नाही असंही नाही. ऐन दिवाळीमध्ये काल बराच वेळ व्हॉट्सअॅप सेवा नीट काम करत नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील अनेक भागातील यूजर्स व्हॉट्सअॅप आउटेजच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच भागात व्हॉट्सअॅप युजर्सना या समस्येचा सामना करावा लागला होता. याशिवाय व्हॉट्सअॅपचे वेब व्हर्जनही व्यवस्थित काम करत नव्हतं. यामुळे लोक त्यांचे महत्त्वाचे संदेश इतर कोणत्याही व्यक्तीला पाठवू शकले नाहीत. हेही वाचा: हे मेसेज पाठवाल तर थेट तुरुंगात जाल! WhatsAppचे नियम तुम्हाला माहिती आहेत का? दुपारी 1 वाजल्यानंतर यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या. सुमारे दोन तासांनंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत झाली. परंतु या दरम्यान बराच गोंधळ उडाला. भविष्यात पुन्हा असा तांत्रिक व्यत्यय आला आणि तुम्ही तुमचे महत्त्वाचे संदेश इतर कोणत्याही व्यक्तीला WhatsApp द्वारे पाठवू शकला नाही तर काळजी करण्याची गरज नाही. या परिस्थितीत तुम्ही मेसेजिंगसाठी काही इतर अॅप्स वापरू शकता. सध्या अनेक दमदार आणि विश्वासार्ह मेसेजिंक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मेसेजिंगसाठी तुम्ही टेलीग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी वापरू शकता. तुम्ही हे अॅप्स Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर सहज डाउनलोड करू शकता.
यापैकी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोक आधीपासूनच वापरतात. ते वापरण्यासही सोपे आहेत. त्यामुळं भविष्यात कधी व्हॉट्सअप सर्व्हर डाउन झाला आणि तु्म्हाला मेसेज पाठवायला अडचण निर्माण झाली, तर या अॅप्सची मदत तुम्ही नक्की घेऊ शकता.