JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुम्हाला माहित आहे का RAM आणि ROM मधील फरक? जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला माहित आहे का RAM आणि ROM मधील फरक? जाणून घ्या सविस्तर

What is the difference between RAM and ROM: रॅम आणि रॉम म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? याविषयीची माहिती सविस्तर जाणून घेऊया…

जाहिरात

Mobile Game खेळण्यास आई-वडिलांनी केली मनाई, 16 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल (प्रातिनिधिक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: आजचं युग हे डिजिटलआहे. या डिजिटल युगाची परिभाषा देखील काहीशी निराळी आहे. या परिभाषेतील बऱ्याचशा तांत्रिक शब्दांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करत असतो. पण, यातील सर्वच तांत्रिक शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती असतोच असे नाही. आपल्यापैकी बहुतांश जण दररोज कॉम्प्युटरचा वापर करतात. तसेच स्मार्टफोन वापरणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनयुजर्समध्ये अशा दोन तांत्रिक शब्दांचा वापर नेहमीच होताना आपण ऐकतो. ते म्हणजे रॅम (RAM) आणि रॉम (ROM). रॅम आणि रॉम म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? याविषयीची माहिती सविस्तर जाणून घेऊया… रॅम आणि रॉममध्ये मोठा फरक असतो. पण याविषयी आपल्याला सखोल माहिती असतेच असं नाही. शाळेतील कंम्प्यूटर क्लासेसमध्ये आपण शिकलो आहोत की रॅम हा कॉम्प्युटर स्पीडसाठी (Speed) असतो. तर रॉमचा वापर स्टोअरेजसाठी (Storage) असतो. रॅम याचा फुल फॉर्म रँडम अॅक्सेस मेमरी (Random Access Memory) असा असून रॉमचा फुल फॉर्म रीड ओन्ली मेमरी (Read Only Memory) असा आहे. मग या दोन्हीत नेमका काय फरक आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक जण इंटरनेट सर्चिंग करतात, परंतु, त्यांना याबाबतची सखोल माहिती मिळतेच असं नाही. जे लोक वर्षानुवर्षे संगणक किंवा मोबाईल वापरतात, त्यांना रॅम आणि रॉममधील फरक माहिती असतो. हे वाचा- सायबर क्रिमिनल्सपासून असं सुरक्षित ठेवा Wi-Fi, सेटिंग्समध्ये करा हे फायदेशीर बदल रॅम ही एक अशी चिप (Chip) असते की जी मोबाईलमध्ये कायमस्वरूपी बसवलेली असते. या चिपला डाटा (Data) सेव्ह (Save) करण्यासाठी पॉवरसह अन्य बाबींची गरज असते. जर याचे पॉवरशी कनेक्शन तुटले तर यातील सर्व माहिती डिलिट होते. रॉमचे कार्य रॅमच्या तुलनेत अगदी उलटं असतं. ही एक अशी चिप असते की जी तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदलू शकता. यावर डेटा सेव्ह केल्यावर तो बदलता येत नाही. परंतु, रॉम म्हणजे रीड ओन्ली मेमरी असल्याने यावरील डेटा आपण केव्हाही केवळ वाचू शकतो, मात्र तो आपल्याला बदलता येत नाही. इंग्रजी भाषेत याला नॉन-व्होलेटाइल स्टोरेज किंवा मेमरी असं म्हटलं जातं. हे वाचा- OLA e-scooter: या 4 चार राज्यात स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत डिव्हाईसवर रोजची कामे करण्यासाठी आपल्याला रॅम उपयोगी पडते. परंतु, रॉमचा वापर हा केवळ त्या डिव्हाईसच्या निर्मितीवेळीच केला जातो. जर तुम्हाला रॉममध्ये काही डेटा सेव्ह करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावं लागतं. परंतु, याउलट रॅममध्ये वेगात तुम्ही डेटा सेव्ह करु शकता. याशिवाय कॉम्प्युटरमधील रॅम आणि रॉममध्ये मोठा फरक असतो. त्याची प्रक्रिया देखील वेगळ्या पद्धतीची असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या