नवी दिल्ली, 8 जून : जगभरात WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. आता प्रायव्हसी पॉलिसीमुळे व्हॉट्सअॅप सतत चर्चेत आहे. याचदरम्यान व्हॉट्सअॅपच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्हॉट्सअॅपचे मेसेजेस इनक्रिप्टेड (Encrypted) असल्याने ते कोणीही वाचू शकत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. व्हॉट्सअॅप मेसेज केवळ एंड-टू-एंड (end-to-end) युजरचं पाहू शकतो. परंतु हे End-to-end encryption नक्की आहे तरी काय, ज्याचा दावा व्हॉट्सअॅपकडून केला जातो. End-to-end encryption टेक्नोलॉजी मेसेज सुरक्षितरित्या सेंड आणि रिसिव्ह करण्याचा एक मार्ग आहे. व्हॉट्सअॅपमध्ये सुरुवातीपासून हे अॅप नव्हतं, परंतु मेसेजच्या सुरक्षिततेच्या मागणीदरम्यान व्हॉट्सअॅपने हे लाँच केलं. समजा, तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखाद्याला hello असा मेसेज करता, त्यावेळी hello सेंड होताच, हा शब्द मशिनी कोडमध्ये बदलला जातो. म्हणजेच हा शब्द मशिनी भाषेत Encrypted होतो. दुसऱ्या एंडला, म्हणजेच ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवला जातो, तिथे हा ‘डिक्रिप्ट’ होतो. म्हणजेच पुन्हा हा कोड hello मध्ये बदलला जातो. ज्याने मेसेज पाठवला त्या व्यक्तीपासून ते ज्याला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीपर्यंत मेसेजचा प्रवास ‘कोड’ रुपात होतो. मध्येच हा मेसेज कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास, तो डिकोड करू शकत नाही. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपचं End-to-end encryption युजर्सची गोपनीयता आणि चॅट्स, डेटाचं संरक्षण करतं.
WhatsApp वर युजर्स टेक्स्ट मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडीओ, व्हॉईस मेसेज, कागदपत्र, स्टेटस अपडेट्स, कॉल्स, व्हिडीओ कॉल्सद्वारे एकमेकांशी जोडलेले असतात. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं व्हॉट्सअॅपची जबाबदारी आहे. दोन लोकांमध्ये होणारं चॅट हॅक होऊ नये, ते चुकीच्या हातात जाऊ नये यासाठी WhatsApp ने ‘एंड-टू-एंड एन्क्रिप्शन’ फीचरची सुरुवात केली. WhatsApp च्या end-to-end encryption चे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे डेटा हॅक करण्यापासून बचाव करतं. हॅकर्सने डेटा हॅक जरी केला, तरी ते डेटा ‘डिक्रिप्ट’ करू शकत नाही. हे फीचर आपल्या स्वातंत्र्याचं तसंच आपल्या गोपनीयतेचं रक्षण करतं.
भारत सरकारने WhatsApp ला दिलेल्या सुचनांनुसार, कोणत्याही मेसेजच्या फर्स्ट ओरिजिनेटरची ओळख करणं गरजेचं आहे. परंतु व्हॉट्सअॅपने हे त्यांचं काम नसल्याचं सांगितलं आहे. मेसेज पाठवणं आणि रिसिव्ह करणं हे केवळ सेंडर आणि रिसिव्हरचं काम आहे. यात व्हॉट्सअॅपची कोणतीही भूमिका नाही, असं कंपनीने म्हटलं आहे. तसंच व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्यावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असंही भारत सरकारने व्हॉट्सअॅपला सांगितलं आहे.