नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : कोरोनानंतर (Coronavirus) देशात इलेक्ट्रिक सायकलची (Electric Cycle) मागणी वाढली असल्याचं समोर आलं आहे. छोट्या शहरांत सर्वाधिक इलेक्ट्रिक सायकलची मागणी आहे. कोरोनानंतर आता अनेक लोक आपल्या फिटनेसप्रति जागरुक होत आहेत. इलेक्ट्रिक सायकल स्टार्टअप Voltro Motors ने इलेक्ट्रिक सायकलच्या मागणीत कोरोनानंतर मोठी वाढ झाल्याची माहिती दिली आहे. Voltro Motors च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यावर्षी 10 कोटी रुपयांच्या विक्रीचं लक्ष्य ठेवलं आहे. ज्यात कंपनी छोट्या शहरांकडे अधिक लक्ष देत आहे. वोल्ट्रो मोटर्सच्या संस्थापकांनी लॉकडाउनमध्ये (Lockdown) सुरुवातीला या व्यवसायात मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं. परंतु आता इलेक्ट्रिक सायकलच्या मागणीत वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. इलेक्ट्रिक सायकलची वाढती मागणी हे सामाजिक बदलाचं वाहन ठरत असून आता आम्ही छोट्या शहरांमध्ये डीलर आणि वितरकांची नियुक्ती करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Voltro Motors Cycle - वोल्ट्रो इलेक्ट्रिक सायकल फुल चार्जमध्ये 75 ते 100 किमीची रेंज देऊ शकते. या सायकलचा टॉप स्पीड 25 किमी ताशी आहे. या सायकलमध्ये लिथियम फॉस्फेट बॅटरी मिळेल. तसंच या सायकलमध्ये मिड-ड्रायव्हर मोटर देण्यात आली आहे.
Voltro Motors Electric Cycle ची किंमत 35 हजार रुपये आहे. ही सायकल एका यूनिटमध्ये फुल चार्ज होते. ज्यात चार्ज करण्यासाठी केवळ 4 रुपये खर्च येतो. Voltro Motors सायकल फुल चार्ज होण्यासाठी जवळपास 3 तासांचा कालावधी लागत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.