JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Vivo चा ‘हा’ पॉप्युलर फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ट्रिपल कॅमेरासह मिळणार जबरदस्त फीचर्स

Vivo चा ‘हा’ पॉप्युलर फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ट्रिपल कॅमेरासह मिळणार जबरदस्त फीचर्स

उत्तम फिचर्स, दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरे यामुळे हा फोन तरुणाईत लोकप्रिय असून, आता किमती कमी झाल्यानं ग्राहकांना स्वस्त दरात उत्तम फोन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : चायनीज स्मार्टफोन कंपनी विवोनं आपल्या वीवो V20 SE (Vivo V20 SE) या फोनच्या किमतीमध्ये मोठी कपात केली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला होता. त्या वेळी त्याची किंमत 20 हजार 990 रुपये होती. आता या फोनच्या किमतीत कपात करण्यात आली असून, 8GB आणि 128GB च्या व्हेरिएन्टची किंमत 19 हजार 990 रुपये करण्यात आली आहे. या फोनच्या कमी झालेल्या किमती वेबसाईटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये 8GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा आहे. ग्रॅव्हिटी ब्लॅक (Gravity Black) आणि अ‍ॅक्वामरीन ग्रीन (Aquamarine Green) या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर अनेक ऑफर्सही मिळणार असून, त्यात 12 महिन्यांची अधिक वॉरंटी आणि एचडीएफसीच्या (HDFC) कार्डवर दोन हजार रुपयांचा कॅशबॅकदेखील मिळणार आहे. हे आहेत खास फीचर्स : Vivo V20 SE मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 (Qualcomm Snapdragon 665) प्रोसेसर असून, हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर आधारित आहे. यामध्ये फनटच ओएस 11 (Fun touch OS 11) सिस्टीम आहे. 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह मिळणाऱ्या या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरदेखील आहे.

(वाचा -  WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय )

Vivo V20 SE की कीमत में कटौती हो गई है. फोनमध्ये मिळणार ट्रिपल कॅमेरा : विवो V20 SE मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा असे तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठीदेखील 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमधील बॅटरीदेखील मोठी असून, यात 4,100 mAh पॉवरची बॅटरी देण्यात आली आहे. याचबरोबर फास्ट चार्जिंगसाठी 33 W चा चार्जरदेखील देण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या 30 मिनिटांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक बॅटरी चार्ज होईल, असा दावा कंपनीनं केला आहे. याचबरोबर फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, वायफाय, FM Radio, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत.

(वाचा -  Jio चा जबरदस्त धमाका; 1999 रुपयांत जिओफोन आणि 2 वर्षांपर्यंत सर्वकाही मोफत )

उत्तम फिचर्स, दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरे यामुळे हा फोन तरुणाईत लोकप्रिय असून, आता किमती कमी झाल्यानं ग्राहकांना स्वस्त दरात उत्तम फोन घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे या फोनच्या विक्रीला चालना मिळेल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या