नवी दिल्ली, 15 जानेवारी : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आपल्या कार्यकाळातील शेवटच्या दिवसांत चीनविरोधात मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने चीनविरोधात मोठा निर्णय घेत, 9 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं आहे. ज्या चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आहे, त्यात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीसह (Xiaomi) 9 कंपन्यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर अमेरिकी इन्व्हेस्टर्सला या कंपन्यांमधून आपली गुंतवणुक बाहेर काढावी लागणार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना 11 नोव्हेंबर 2021 पर्यंतचा वेळ आहे. यापूर्वी अमेरिकेने चिनी कंपनी Huawei आणि ZTE सोबतही असं केलं आहे. शाओमीशिवाय बॅन होणाऱ्या कंपन्यांमध्ये चीनची प्लेन निर्माता कंपनी Comac, तेल प्रॉडक्शन कंपनी CNOOC ही सामिल आहे. CNOOC ही चीनची सर्वात मोठी सरकारी ऑईल कंपनी आहे.
याप्रकरणी बोलताना अमेरिकेने सांगितलं की, या कंपन्यांमुळे देशाच्या सुरक्षेततेला धोका आहे. त्यामुळेच या चिनी कंपन्या अमेरिकेत बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये अमेरिकी सरकारने 60 चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं होतं. चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi, Cnooc शिवाय, अधिक कंपन्या एविएशन, एयरोस्पेस, टेलिकम्युनिकेशन, कंस्ट्रक्शन क्षेत्राशी निगडीत आहेत. सरकारने Xiaomi कंपनीला कम्यूनिस्ट चायनीज मिलिट्री कंपनी म्हणून लेबल केलं आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून 6 जानेवारी रोजी एक्झिक्यूटिव्ह ऑर्डर पास करुन WeChat Pay, Alipay सारखे 9 Apps बॅन केले.