JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / रस्त्यावर नाही थेट झाडावर चालते ही भन्नाट स्कूटर, वाचा काय आहे या Tree Scooter ची कहाणी

रस्त्यावर नाही थेट झाडावर चालते ही भन्नाट स्कूटर, वाचा काय आहे या Tree Scooter ची कहाणी

एक अनोखी स्कूटर (Scooter) लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर रस्त्यावर चालत नाही तर थेट झाडावर चढते. त्यामुळेच या स्कूटरला ट्री स्कूटर (Tree Scooter) असं नाव देण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 मार्च : देशात अनेक नवी वाहनं लाँच होत असतात. इलेक्ट्रिक स्कूटर, विविध कंपन्यांच्या कार्स युजर्सच्या बजेटनुसार, त्यांच्या सोयीनुसार, कामानुसार किंवा मागणीनुसार लाँच होत असतात. आता या सगळ्याच्या पुढे जात एक अनोखी स्कूटर (Scooter) लाँच करण्यात आली आहे. ही स्कूटर रस्त्यावर चालत नाही तर थेट झाडावर चढते. त्यामुळेच या स्कूटरला ट्री स्कूटर (Tree Scooter) असं नाव देण्यात आलं आहे. हा अनोखा अविष्कार एका शेतकऱ्याने केला असून शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या ट्री स्कूटरमुळे मेहनत, रिस्क आणि खर्चाचीही बचत होईल. कर्नाटकातील मँगलोर इथे राहणारे 50 वर्षीय गणपति भट्ट हे सुपारीची (Karnataka Farmer) शेती करतात. सुपारी तोडण्यासाठी त्यांना 60 ते 70 फूट उंच झाडांवर चढावं लागतं. हे अतिशय मेहनतीचं तसंच धोक्याचंही काम आहे. पावसाळ्यात झाडं ओली झालेली असताना याची रिस्क मोठ्या प्रमाणात वाढते. हेच सर्व धोके लक्षात घेता गणपति यांनी ट्री स्कूटर बनवली असून यामुळे धोका कमी होऊन वेळ, खर्चही वाचण्यास मदत होईल. वाढतं वय, मजूरांची कमतरता, त्यांचा खर्च, पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांमुळे त्यांना ट्री स्कूटरची कल्पना आली.

हे वाचा -  Electric Scooter खरेदी करायची आहे? या 3 स्कूटर ठरतील चांगला पर्याय

मिळालेल्या माहितीनुसार, गणपति यांनी ही भन्नाट स्कूटर घरीच तयार केली आहे. यात एक लहानशी मोटर बसवण्यात आली आहे आणि दोन सीट देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सीट बेल्टही देण्यात आला आहे. स्कूटरला हँडल ब्रेक आणि क्लचही आहे. या ट्री स्कूटरवर बसून ज्यावेळी एक्सेलरेटर फिरवलं जातं त्यावेळी टायर फिरतात आणि झाडावर दोन्ही बाजूने पकड घेत स्कूटर वर चढते. 2014 मध्ये त्यांनी या स्कूटरवर काम सुरू केलं होतं. 4 लाख रिसर्च आणि 40 लाख रुपये खर्च करुन त्यांनी ही ट्री स्कूटर तयार केली. आता ते या स्कूटर बनवून त्याची विक्री करतात. 62000 रुपयांत ही स्कूटर असून आतापर्यंत 300 यूनिट विक्री झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या