JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Tecno Smartphone: चक्क रंग बदलणारा स्मार्टफोन 3 दिवसांनी होणार लाँच, झक्कास फीचर्स, किंमतही कमी

Tecno Smartphone: चक्क रंग बदलणारा स्मार्टफोन 3 दिवसांनी होणार लाँच, झक्कास फीचर्स, किंमतही कमी

Tecno Smartphone: प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी टेक्नोनं आपल्या स्टायलिश Camon 19 Pro Mondrian Edition स्मार्टफोनची लाँचची तारीख जाहीर केली आहे. स्टायलिश लूक आणि खास स्पेसिफिकेशन असलेला हा नवीन स्मार्टफोन ‘कलर चेंजिंग बॅक पॅनल’नं सुसज्ज आहे.

जाहिरात

Tecno Smartphone: चक्क रंग बदलणारा स्मार्टफोन 3 दिवसांनी होणार लाँच, झक्कास फीचर्स, किंमतही कमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर**:** स्मार्टफोन कंपन्या नवनवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स स्मार्टफोनमध्ये दिली जात आहेत. याशिवाय कॅमेरा, साऊंड, स्मार्टफोनचं डिझाईन या सर्व गोष्टींमध्ये स्मार्टफोन कंपन्या विविध प्रयोग करत आहेत. अशा परिस्थितीत गेम खेळणाऱ्यांसाठी गेमिंग मोबाईल, मल्टीमीडियाची आवड असणाऱ्यांसाठी मल्टीमीडिया मोबाईल, सेल्फी काढण्याची हौस असणाऱ्यांसाठी सेल्फी मोबाईल अशी विविध प्रकारचे मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या डिझाईनमध्येही विशेष लक्ष्य घातलं आहे. विविध कंपन्यांनी पिवळ्या, निळ्या, लाल अशा विविध रंगसंगतीमध्ये अनेक स्मार्टफोन लांच केले आहेत. आता प्रसिद्ध मोबाईल कंपनी टेक्नोनं (Tecno) आपल्या ग्राहकांसाठी खास मोबाईल लाँच करणार आहे. टेक्नो लाँच करणार ‘कलर चेंजिंग बॅक पॅनल’नं सुसज्ज स्मार्टफोन- प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी टेक्नोनं आपल्या स्टायलिश Camon 19 Pro Mondrian Edition स्मार्टफोनची लाँचची तारीख जाहीर केली आहे. स्टायलिश लूक आणि खास स्पेसिफिकेशन असलेला हा नवीन स्मार्टफोन ‘कलर चेंजिंग बॅक पॅनल’नं सुसज्ज आहे. हा फोन भारतीय ग्राहकांसाठी 15 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल. कंपनीनं ट्विटर पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. Tecno Camon 19 Pro Mondrian Edition ची वैशिष्ट्ये- हा एक 4G फोन आहे जो Helio G96 चिपसेटनं सुसज्ज आहे. डिव्हाइस पंच-होल डिझाइनसह 6.8-इंचाच्या IPS LCD डिस्प्लेसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन फुल एचडी + रिझोल्यूशन, 20.5:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेट जनरेट करतो. हेही वाचा-  महत्त्वाचं काम सुरू असताना मोबाइल डेटा संपला? एअरटेलच्या `या` सुविधेमुळं तात्काळ मिळेल उधार डेटा

संबंधित बातम्या

64 मेगापिक्सेल कॅमेऱ्यानं सुसज्ज- फोनच्या फ्रंटमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. त्याच्या मागील पॅनेलमध्ये 64-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ-सेन्सिंग युनिट आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 5 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. हा फोन 128 GB स्टोरेज सह येईल. यात 33W फास्ट चार्जिंगसह 5000mAH बॅटरी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या