लॉकडाऊनमध्ये भारतीय लोक प्रतिदिन 280 मिनिटं इंटरनेटचा वापर करत असल्याचं दिसून आलं.
मुंबई, 17 डिसेंबर: सध्या जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. अगदी स्वस्तात मिळणाऱ्या स्मार्टफोनपासून महागड्या फोन्सची बाजारात रेलचेल आहे. यासाठी आवश्यक त्या अॅक्सेसरीजही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. यामध्ये हेडफोन, पॉवर बँक, फोन केस, स्क्रीन गार्ड यांचा समावेश आहे. या उत्पादनांची मोठी उलाढाल बाजारात होते. आपला फोन सुरक्षित रहावा यासाठी काही अॅक्सेसरीज बाजारात मिळतात. तरीही फोन ठिक राहिल याची खात्री देता येत नाही. अशावेळी महागड्या फोनसाठी आपण विमा पॉलिसीसुद्धा घेऊ शकतो. यामुळे फोन खराब झाल्यास आपलं आर्थिक नुकसान कमी होतं. मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास होतात. फोन चोरीला जाण्यापेक्षा धोकादायक असतं ते म्हणजे त्यातील डेटा आणि सोशल मीडिया लॉगइन. यातून होणाऱं नुकसान टाळण्यासाठीही विमा योजना मिळतात. यासाठी संबंधित मोबाईल कंपनी किंवा डिलर्सकडे माहिती मिळते. कोणत्याही मोबाईल कंपन्या सर्वसाधारणपणे एक वर्षांची वॉरंटी देतात. मात्र, विमा पॉलिसीद्वारे ही वॉरंटी वाढवता येते. कंपन्यांकडून याची माहिती दिली जाते. मोबाइल नादुरुस्त झाल्यास याचा विम्याचा फायदा होऊ शकतो. पण चोरी झाल्यास किंवा हरवल्यास ग्राहकाला नुकसान भरपाई मिळत नाही. वाचा : लॅपटॉप शटडाऊन न करता झोपणं पडलं महागात, थोडक्यात वाचला जीव सुरक्षिततेच्या दृष्टीने घराचाही विमा काढला जातो. यामध्ये घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असतो. यामध्ये स्मार्टफोनवरही विम्याचा लाभ मिळू शकतो. जर घराच्या विम्यामध्ये स्मार्टफोन असेल तर घरात चोरी किंवा इतर कारणाने स्मार्टफोनचं नुकसान झालं तर लाभ मिळू शकतो. वाचा : तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय? जाणून घ्या कसं चेक करायचं