Elec-widget

तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय? जाणून घ्या कसं चेक करायचं

तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय? जाणून घ्या कसं चेक करायचं

तुमच्या परवानगीशिवाय तुमचे कॉल कोणी रेकॉर्ड करत असेल तर तुम्ही ते स्वत: चेक करू शकता.

  • Share this:

तुमच्या परवानगीशिवाय तुमचे कॉल कोणी रेकॉर्ड करत असेल तर तुम्ही ते स्वत: चेक करू शकता. भारतासह अनेक देशांमध्ये तुमच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड केले जातात. आता हे कॉल रेकॉर्ड होत आहेत की नाहीत हे तुम्हालाही चेक करता येईल. मात्र, सरकारी एजन्सीकडून असं रेकॉर्डिंग केलं जात असेल तर ते शक्य नाही. सरकारी संस्था टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करतात ते समजत नाही. मात्र, इतर कोणी तसं करत असेल तर तुम्हाला ते ओळखता येतं.

काळजीपूर्वक ऐका - जेव्हा तुम्हाला एखादा कॉल येतो तेव्हा काही सेकंदानंतर जर बीपचा आवाज आला तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे असं समजा. अशा वेळी तुम्ही विचारू शकता.

फोन ओव्हर हिटिंग - ही एक सर्वसामन्य समस्या असली तरी वारंवार होत असेल तर लक्ष देण्याची गरज आहे. काऱण कॉल रेकॉर्डिंग असंही होऊ शकतं. तुमच्या फोनमध्ये असं एखादं अॅप असतं ज्यामुळे रेकॉर्डिंग इतरत्र पाठवलं जातं. त्यासाठी बॅकग्राउंडला सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे ओव्हर हिटिंगची समस्या निर्माण होते.

डेटा वापर - तुमचा डेटा कोणत्या गोष्टीसाठी वापरला गेला हे समजतं. तुम्ही वापर केलेला नसतानाही कधी कधी तो संपल्याचं दिसत असेल तर नक्कीच फोनमधील डेटा चोरला जात असण्याची शक्यता असते.

नको असलेली अॅप्स आणि संदेश - फोनमध्ये लिमिटेड अॅप वापरणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. मात्र अशी अनेक अॅप्स असतात ज्यावर जाहिरातींचा भडिमार असतो. त्या अॅप्समधून बॅकग्राउंड सिस्टिम कॉल रेकॉर्ड करू शकते.

Loading...

फोन वापरत नसताना स्क्रिन ऑन - तुमच्या फोनवर कोणतंही नोटिफिकेशन न येता किंवा त्याचा वापर सुरू नसतानाही स्क्रिन ऑन होणं किंवा सायलंट होण्याचे प्रकार होत असतील किंवा सेल्फी कॅमेरा सुरु होत असेल तर तुमच्या फोनमध्ये हेरगिरी केली जात असल्याची शक्यता आहे.

स्विच ऑफ होण्यास वेळ - फोन शट डाउन करण्याची प्रोसेस तेव्हा पूर्ण होते जेव्हा बॅकग्राउंडचे सर्व अॅप्स बंद होतात. जर कॉल रेकॉर्डिंग किंवा इतर स्पाय अॅप असतील तर मोबाईल बंद होण्यास उशिर लागतो.

विचित्र टेक्स्ट मेसेज - जर तुम्हाला न समजणारे मेसेज येत असतील ज्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, सिम्बॉल असतील तर त्यापासून सावध रहा.

अशी घ्या काळजी -स्मार्टफोनमध्ये असा कोणताही प्रकार आढळला तर तुमच्या फोनमधील अॅप चेक करा. कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना त्यासाठी आपण काय काय परवानगी देतो ते पाहा. त्याशिवाय इतर अॅपमधून कोणती माहिती गोळा केली जाते हेसुद्धा चेक करा. तसेच वरीलपैकी काही समस्या वारंवार येत असतील तर फोनचा बॅकअप घेऊन फॅक्टरी रिसेट करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Nov 19, 2019 02:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com