नवी दिल्ली, 20 जून : जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. प्रायव्हेट सेक्टर नोकऱ्यांमध्ये योग्य वेळी योग्य माहिती मिळवणं कठीण होतं. अनेकदा ओळखीवरच प्राथमिकता देण्यात येते, अशा घटनाही समोर येतात. अशा शक्यता रोखण्यासाठीच सरकार प्रत्येक क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचं काम करत आहे. कोणत्या कंपनीमध्ये किती वॅकेन्सी आहेत आणि कोणत्या पात्रतेची गरज आहे, ही सर्व प्राथमिक माहिती आता केवळ एका क्लिकवर मिळू शकते. नोकरी शोधण्यासाठी आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची आवश्यकता नाही. प्रायव्हेट सेक्टरशी संबंधित नोकरीची संपूर्ण माहिती आता सरकारी प्लॅटफॉर्म नॅशनल करियर सर्विस (NCS) पोर्टलवर मिळेल. इथे सर्व कंपन्यांचा लेटेस्ट डेटा आणि जॉब रिक्वॉयरमेंटसह इतरही माहिती मिळेल. सीएनबीसीच्या एका रिपोर्टमध्ये देशात लागू होणाऱ्या नवीन कामगार कायद्यांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व खासगी कंपन्यांना शासकीय पोर्टलला वर्षभरात किती रिक्त पदं आहेत याची माहिती देण्याचं सांगण्यात आलं आहे. कंपन्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरही रिक्त जागांबाबतची माहिती देऊ शकतात.
1 जुलैपासून नवा कामगार कायदा लागू होऊ शकतो. यासाठी कामगार मंत्रालयाने (Ministry of Labour and Employement) जवळपास संपूर्ण तयारी केली आहे. तुम्ही ज्या कामात एक्सपर्ट असाल, त्या प्रकारचा जॉब युजर्सला या पोर्टलवर मिळू शकतो. यासाठी केवळ या पोर्टलवर तुमचं नाव रजिस्टर करावं लागेल.
केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं, की 2015 मध्ये सुरू झालेली नॅशनल करियर सर्विस (NCS) तरुणांचे रोजगार आणि करियरच्या गरजा पूर्ण करत आहे. यात रोजगाराशी संबंधित अनेक प्रकारच्या सेवा व्यवसायाविषयी सल्ला, व्यवसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती, अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप इत्यादी सुविधा देण्यात येत आहेत. त्यामुळे आता प्रायव्हेट क्षेत्रात नोकरीसाठी आता सरकारी पोर्टलवर तुमच्या कामासंबंधी संपूर्ण माहिती मिळवू शकता.