नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : देशात बँकिंग फ्रॉडची (Banking Fraud) प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. विविध प्रकारे लोकांची फसवणूक केली जात आहे. अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (State Bank of India) आपल्या ग्राहकांना सतत सतर्क करत असते. SBI ने ट्विट करुन आपल्या 44 कोटी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. SBI ने ट्विट करुन बनावट कस्टमर केअर नंबर फ्रॉडबाबत सावधतेचा इशारा दिला आहे. बँकेने ट्विट करत सांगितलं, की फेक, बनावट कस्टमर केअर नंबरपासून सावध राहा. योग्य कस्टमर केअर नंबरसाठी SBI च्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. खासगी बँकिंग माहिती कोणाशीही शेअर करू नका. बँकेने ट्विटमध्ये एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. ज्यात एक व्यक्ती बनावट कस्टमर केअर नंबरवर चुकून फोन करतो. त्या व्यक्तीकडून संपूर्ण बँकिंग डिटेल्स घेतले जातात आणि फ्रॉड केला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर युजरने लगेचच रिपोर्ट करणं गरजेचं असल्याचंही बँकेने सांगितलं आहे. युजर report.phising@sbi.co.in या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर किंवा 155260 वर कॉल करू शकतात.
फ्री गिफ्ट - SBI ने फ्री गिफ्टच्या नावे होणाऱ्या फ्रॉडबाबतही ग्राहकांना सतर्क केलं आहे. फ्रॉडस्टर्स फ्री गिफ्टचं आमिष दाखवून ग्राहकांना लिंक पाठवतात, आणि त्यांचे पर्सनल डिटेल्स चोरी करतात. त्यामुळे चुकूनही कोणत्याही नंबरवरुन आलेल्या मेसेजच्या लिंकवर क्लिक करू नका. Google वर कधीही कस्टमर केअर नंबर सर्च करू नका. तसंच बँकेच्या नावाने कस्टमर केअरमधून बोलत असल्याचं सांगत कोणत्याही नंबरवरुन कॉल आल्यास, त्यावर तुमची माहिती देऊ नका.