नवी दिल्ली, 14 जुलै: स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) भारतीय बाजारात आपले नवे स्मार्टफोन लाँच करत आहे. कंपनीने 21 जून 2021 रोजी आपला सॅमसंग गॅलेक्सी M 32 (Samsung Galaxy M32) फोन लाँच केला. कंपनीने लोकांचं बजेट लक्षात घेता स्मार्टफोनची किंमत कमी ठेवली आहे. तसंच Amazon वर या स्मार्टफोन खरेदीवर ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंट (Amazon Offer) मिळणार आहे. 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंट फोन 14,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. Amazon वर सेल सुरू असून कंपनीने त्या लिस्टमध्ये आपला स्मार्टफोन ठेवला आहे. ग्राहकांना Samsung Galaxy M32 वर 4 हजार रुपयांपर्यंतची ऑफर मिळत आहे. Samsung Galaxy M32 स्पेसिफिकेशन्स - - 6.32 इंची डिस्प्ले - 6000 mAh बॅटरी - One UI 3.1 - अँड्रॉईड 11 - मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसर क्वाड रिअर कॅमेरा - Samsung Galaxy M32 फोनला प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, तर दुसरा 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स, तर 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. (वाचा - जुना फोन विकण्याआधी किंवा Exchangeकरण्यापूर्वी ही 3 कामं कराच;अन्यथा येईल समस्या ) - ICICI बँकेच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर मोठा फायदा मिळतो आहे. ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन पेमेंट केल्यानंतर 1250 रुपयांची सूट आहे. - तसंच एखाद्याकडे Prime Member असेल, तर 10 हजार रुपयांपर्यंतचा फायदा आहे. - त्याशिवाय फोन एक्सचेंज करुन 11,110 रुपयांपर्यंतची ऑफर आहे. एक्सचेंजमध्ये इतका मोठा फायदा झाल्यास, हा फोन केवळ 3899 रुपयांत खरेदी करता येईल. म्हणजेच या ऑफरमध्ये 14,999 चा फोन एक्सचेंज किंमतीनंतर 4 हजारांपर्यंत खरेदी करता येईल. तसंच ICICI युजर्स EMI वर स्टँडर्ड प्लॅनमध्ये 1361 रुपये दर महिन्याला देऊन हा फोन खरेदी करू शकतात. 12 महिन्यांपर्यंत ग्राहकांना 1361 रुपये EMI भरावा लागेल. (वाचा - Mi Anniversary Sale: स्वस्त स्मार्टफोनसह फ्रीमध्ये मिळतोय Wifi Smart Speaker ) HDFC बँकेचे युजर्स EMI वर स्टँडर्ड प्लॅनमध्ये 943 दर महिन्याला देऊन फोन खरेदी करू शकतात. दर महिन्याला EMI वर 943 रुपये 18 महिन्यांपर्यंत भरावे लागतील.