नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : रिलायन्स जीओ (reliance jio) आपला नवा स्वस्तातला 5 जी स्मार्टफोन (Jio 5G Phone) बाजारात आणण्याची योजना आखत आहेत. हा फोन सुरुवातीला केवळ 5000 रुपयांत लाँच करण्याची योजना आहे. पुढील काळात विक्रीत वाढ झाल्यानंतर किंमत कमी करुन 2500-3000 रुपयांपर्यंत करण्याची योजना आहे. कंपनी या योजनेंतर्गत सध्या 2 जी (2 G)कनेक्शनचा वापर करणाऱ्या 20-30 कोटी मोबाईल युजर्सला लक्ष्य करत आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीओ फोनची (Jio 5G Phone) किंमत 5000 हूनही कमी ठेवण्याची योजना आहे. विक्री वाढल्यानंतर किंमती 2500-3000 रुपयांपर्यंत होऊ शकतात. सध्या भारतात मिळणाऱ्या 5जी स्मार्टफोनची किंमत 27000 रुपयांपासून सुरू होते. (वाचा - आता फक्त 19 मिनिटांत चार्ज होणार तुमचा स्मार्टफोन; या कंपनीची जबरदस्त टेक्नोलॉजी ) रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी, कंपनीच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भारताला 2 जी मुक्त करण्याबाबत म्हटलं होतं. त्यासोबतच एका स्वस्त 5जी स्मार्टफोनच्या आवश्यकतेवरही जोर दिला होता. (वाचा - JIO च्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ; एयरटेल, वोडाफोन-आयडियाला मोठं नुकसान ) दरम्यान, कंपनी आपल्या 5 जी नेटवर्क उपकरणांवरदेखील काम करत आहे. तसंच दूरसंचार मंत्रालयाला या उत्पादनांच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रमचं वाटप करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सरकारकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
नुकतंच, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (TRAI) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, Jioच्या सक्रिय ग्राहकांच्या संख्येत जुलैमध्ये 25 लाखांची वाढ झाली आहे. जुलै 2020 मध्ये जीओच्या सक्रिय ग्राहकांची संख्या 31.3 कोटी होती.