मुंबई, 5 सप्टेंबर : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये मोबाइल फोन, स्मार्टफोन्स आणि प्लॅन्स उपलब्ध करून देणं, ही रिलायन्स जिओची खासियत आहे. आजच्या 5Gच्या युगातही या कंपनीचं हे वैशिष्ट्य कायम राहणार आहे. रिलायन्स जिओचा 5G फोन हा दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होणार आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दिवाळीपूर्वी देशात जिओ 5G ची सुरु होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये 5 G सेवा सुरु होणार आहे. मुंबईमध्ये दिवाळीपूर्वी जिओ 5G सेवा लाँच होणार आहे. रिलायन्स जिओ आणि गुगल या दोन कंपन्यांनी मिळून गेल्या वर्षी Jio Phone Next हे मॉडेल सादर केलं होतं. तो फोन 4G होता; मात्र आता रिलायन्स कंपनी सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत 5G स्मार्टफोन विकसित करत आहे. देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव अलीकडेच झाला आणि येत्या काही काळात 5G सेवा भारतात सुरू होणार आहे. कसा असेल फोन? या Jio Phone 5G फोनला 6.5 इंच आकाराचा HD डिस्प्ले असण्याची शक्यता असून, त्या फोनला 4 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज क्षमता असेल. ड्युएल कॅमेरा सिस्टीम असलेल्या या फोनला 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असेल. त्याशिवाय अँड्रॉइडची खास बनवण्यात आलेली Pragati ऑपरेटिंग सिस्टीमही या फोनमध्ये असेल, अशी अटकळ बांधली जात आहे. Facebook Features: फेसबुक युझर्सना झटका; ‘हे’ लोकप्रिय फीचर होणार बंद सध्या या फोनच्या किमतीबद्दलही काही आडाखे बांधले जात आहेत. त्यानुसार, Jio Phone 5G ची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ग्राहकांना हा फोन विकत घेण्यासाठी 2500 रुपयांचं डाउन पेमेंट करावं लागण्याची शक्यता आहे. याआधी आलेल्या Jio Phone Next सोबत बंडल्ड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग या सुविधा देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणेच या सुविधा Jio Phone 5G सोबतही दिल्या जाण्याची शक्यता आहे. तसंच, कोणत्याही जिओ स्टोअरमध्ये आणि Amazon वर Jio Phone 5G हा फोन सहज उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना तो विकत घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. जिओने दिवाळी 2022 पर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. डिसेंबर 2023 पर्यंत 18 महिन्यांत संपूर्ण भारत कव्हर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने इतर शहरे आणि शहरांमध्ये त्याचा विस्तार केला जाईल. Jio ची महत्त्वाकांक्षी 5G रोलआउट योजना जगातील सर्वात वेगवान असेल.