JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 108 MP कॅमेरासह Redmi Note 11 Pro आज लाँच होणार, पाहा काय आहे बजेट फोनची किंमत

108 MP कॅमेरासह Redmi Note 11 Pro आज लाँच होणार, पाहा काय आहे बजेट फोनची किंमत

Redmi आज (9 मार्च 2022) भारतात आपला Redmi Note 11 Pro नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 मार्च : सध्या स्मार्टफोन्सची (Smartphone) मोठ्या प्रमाणात चलती आहे. आपल्याकडे सर्वात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि फीचर्स असलेला फोन असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्मार्टफोन्सची मागणी लक्षात घेता विविध मोबाइल निर्मित्या कंपन्यादेखील अद्ययावत फीचर्स असलेले फोन बाजारात आणण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात. मोबाइल निर्मितीसाठी ओळखली जाणारी कंपनी रेडमीसुद्धा (Redmi) या स्पर्धेमध्ये आहे. शाओमी (Xiaomi) या चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या रेडमीने आतापर्यंत अनेक चांगले स्मार्टफोन्स लाँच केले असून ते ग्राहकांच्या पसंतीसदेखील उतरलेले आहेत. स्वस्त आणि टिकाऊ स्मार्टफोन निर्मातीसाठी प्रसिद्ध असलेली Redmi आज (9 मार्च 2022) भारतात आपला Redmi Note 11 Pro  नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन चीनमध्ये Redmi Note 11 सोबतच लाँच करण्यात आला आहे. 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला रेडमी नोट 11 प्रो मीडियाटेक डायमेन्शन (MediaTek Dimension) 920 प्रोसेसरने सुसज्ज आहे. रेडमी नोट 11 प्रो स्मार्टफोनमधील बॅटरी (Battery) 5000 mAh ची असून त्यासोबत 67W सॉनिक चार्ज 3.0 (67W Sonic Charge 3.0) सपोर्ट मिळणार आहे. Redmi Note 11 Pro फीचर्स - रेडमी नोट 11 Pro फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 920 प्रोसेसर आणि 5G कनेक्टिव्हिटी आहे. या फोनमध्ये 6.67 इंची सुपर AMOLED डिस्प्ले (120Hz Super Amoled) असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोनमध्ये 8 GB रॅम (RAM) आणि 256 GB स्टोरेज क्षमता आहे. उत्तम साउंड क्वालिटीसाठी फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत.

हे वाचा -  सर्वात स्वस्त नवा iPhone लाँच पण भारतात मिळणार 11000 रुपयांनी महाग, पाहा काय आहेत iPhone SE चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11 Pro किंमत - मिळालेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 11 Pro दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट असेल. बेस मॉडेलची किंमत 16 हजार 999 रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 18 हजार 999 रुपये असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन फँटम व्हाइट, स्काय ब्लू आणि स्टेल्थ ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये (Color Options) लाँच केला जाणार आहे.

हे वाचा -  तुमचा मोबाइल नंबर Jio मध्ये Port करायचा आहे?केवळ 6 स्टेप्समध्ये करा सोपी प्रोसेस

कॅमेरा - रेडमी नोट 11 Pro फोनमध्ये क्वाड-रीअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108MP रियर कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या पुढील बाजूस 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रेडमी नोट प्रो सीरीज लिक्विड कूलिंग (Liquid Cooling) टेक्नोलॉजीसह लाँच केली जाणार आहे. हे तंत्रज्ञान स्मार्टफोनचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Redmi Note 11 Pro हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या