JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Public Wi-Fi सेफ नाही, हॅकर्स असा चोरी करतात डेटा; या गोष्टी लक्षात ठेवाच

Public Wi-Fi सेफ नाही, हॅकर्स असा चोरी करतात डेटा; या गोष्टी लक्षात ठेवाच

पब्लिक वायफायद्वारे (Public Wi-Fi) हॅकर्स (Hackers) युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करत आहेत. . पब्लिक वायफायमध्ये तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे सुरक्षा उपाय आणि एन्क्रिप्शनची कमी आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : तुम्हीही स्मार्टफोन (Smartphone) वायफायला (Wi-Fi) कनेक्ट करत असाल, तर सावध राहण्याची गरज आहे. एका रिपोर्टनुसार, पब्लिक वायफायद्वारे (Public Wi-Fi) हॅकर्स (Hackers) युजर्सचा पर्सनल डेटा चोरी करत आहेत. याचा सर्वाधिक धोका आयफोन युजर्सला आहे. पब्लिक वायफायमध्ये तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे सुरक्षा उपाय आणि एन्क्रिप्शनची कमी आहे. अनेकदा हॅकर्स युजर्सला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी स्वत:चं सार्वजनिक वायफाय सेटअप करतात. Public Wi-Fi द्वारे स्मार्टफोन युजर्सला टार्गेट करण्यासाठी अनेक पद्धती हॅकर्सकडून वापरल्या जातात. सर्वसाधारणपणे ‘मॅन-इन-द-मिडल’ (MITM) अटॅक, आणि दुसरं ‘पॅकेट स्नीफिंग’ अटॅक पद्धतीचा वापर करतात. MITM अटॅकमध्ये डेटा चोरीसाठी मॅलिशियस थर्ड पार्टी इंटरसेप्टचा वापर केला जातो. तर पॅकेट स्नीफिंग अटॅकमध्ये हॅकर्स वायफायद्वारे अॅक्सेस केली जाणारी माहिती मिळवतात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या वाय-फायला पासवर्डची सुरक्षा नसते. त्यामुळे युजरने वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर त्याचा MAC Address आणि IP Address हॅकर्सकडे जाऊ शकतो. त्यावेळी हॅकर्स Packets ला Intercept करून युजर्सची Browsing History मिळवतात. त्याचबरोबर हॅकर्स Network Sniffing करून Visible Traffic ला ही Intercept करू शकतात. त्यामुळे युजरचा सर्व डाटा सहजरित्या हॅकर्सकडे जमा होण्याची शक्यता असते.

हे वाचा -  Smartphone चोरी झाला?हे आहेत शोधण्यासाठीचे सोपे पर्याय;स्विच ऑफ फोनही होईल ट्रॅक

हॅकर्स ईमेल लॉगइन, बँक डिटेल्स, पर्सनल फोटो आणि व्हिडीओपासून ते घराच्या अॅड्रेसपर्यंतचा महत्त्वाचा डेटा चोरी करू शकतात. यापासून वाचण्यासाठी VPN चा वापर करणं महत्त्वाचं ठरतं, जेणेकरुन तुम्ही तुमचा फोन हॅकर्सच्या संपर्कात येण्यापासून वाचवू शकता. iPhone मध्ये कसा कराल VPN चा वापर - VPN एक वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क असतं, जे एका पब्लिक नेटवर्कवर प्रायव्हेट नेटवर्कची सुविधा देतं. हे युजर्सला थर्ड पार्टीच्या संपर्कात न येता, डेटा जमा न करता सुरक्षितपणे इंटरनेट वापरण्यासाठी सक्षमकरतो. iPhone मध्ये VPN App असल्याने तुमचा डेटा Wi-Fi नेटवर्कशी सुरक्षित राहील, ज्याला तुमचा फोन कनेक्ट आहे. App Store वर अनेक VPN Service App उपलब्ध आहेत.

हे वाचा -  Google वर दिवस-रात्र काय Search करतात तरुणी? ही लिस्ट एकदा पाहाच

तसंच पब्लिक स्पेसच्या ठिकाणी फ्री Wi-Fi चा वापर करत असाल, तर त्यावेळी स्मार्टफोनवरून कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नका. फ्री वाय-फाय कनेक्शन वापरण्याआधी त्याची विश्वासार्हता चेक करा. ते कोणत्या संस्थेचं आहे किंवा कोणाच्या नावाने आहे किंवा अजून किती लोक याचा वापर करतात. याची खात्री करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या