JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Banking Fraud रोखण्यासाठी या 8 गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा बसेल मोठा फटका

Banking Fraud रोखण्यासाठी या 8 गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा बसेल मोठा फटका

बँक खातं सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांसाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : देशात कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), बँकिंग फ्रॉडच्या (Banking Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) विविध मार्गांनी, विविध पद्धतींचा वापर करुन अनेकांची फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आपलं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांसाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी (Rakshabandhan 2021) बँकेने ग्राहकांसाठी खास माहिती शेअर केली आहे, ज्याद्वारे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. त्याशिवाय सायबर फ्रॉडपासूनही (Cyber Fraud) बचाव करता येऊ शकतो. बँक खात्याच्या सुरक्षेबाबत काही महत्त्वपूर्ण टिप्स बँकेने शेअर केल्या आहेत. S – ऑनलाईन स्कॅमपासून (Online Scam) सावधान राहा U – स्ट्राँग पासवर्डचा (Strong Password) वापर करा. R – अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. A – अनोळखी लोकांकडून डाउनलोड करण्यासाठी सांगितलेले Apps डाउनलोड करू नका. K – खात्यात होणाऱ्या ट्रान्झेक्शनवर लक्ष ठेवा. S – पर्सनल डेटा सिक्योर ठेवा. H – ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना पीन, CVV, OTP कडे लक्ष द्या. A – फोनमध्ये अँटीव्हायरस नेहमी अपडेट ठेवा.

Hacking पासून वाचण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर, फॉलो करा सोप्या Tips

संबंधित बातम्या

ऑनलाइन फ्रॉडमध्ये गेलेले पैसे 24 तासांत मिळू शकतात परत; फक्त करा हे छोटं काम

तुमच्या खात्याचे, तुमचे कोणतेही पर्सनल डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका. फ्रॉड करणारे बँकांचा अधिकारी असल्याचं सांगत, पर्सनल डिटेल्स आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, अकाउंट नंबर, ओटीपी मागतात. परंतु अशी माहिती शेअर करू नका. कोणत्याही बँका किंवा संस्था कधीही अशाप्रकारची माहिती ग्राहकांकडे मागत नाही. त्यामुळे कोणी बँकेच्या नावाने फोन करुन अशी विचारणा करत असेल, तर वेळीच सावध व्हा. अन्यथा ऑनलाईन फ्रॉड होऊन अकाउंट खाली होऊ शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या