JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Paytm ची भन्नाट ऑफर, UPI ट्रान्सफरवर मिळेल Cashback; असा घेता येईल फायदा

Paytm ची भन्नाट ऑफर, UPI ट्रान्सफरवर मिळेल Cashback; असा घेता येईल फायदा

Paytm ने 6 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत पेटीएम इंडियाने वेस्टइंडीज वनडे आणि T20 मॅचदरम्यान यूपीआय मनी ट्रान्सफरवर (UPI Money Transfer) कॅशबॅक आणि इतर ऑफर्सची घोषणा केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : तुम्ही ऑनलाइन पेमेंटसाठी पेटीएमचा (Paytm) वापर करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी बंपर कॅशबॅक ऑफर (Paytm Cashback Offer) आणली आहे. पेटीएमने 6 ते 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत पेटीएम इंडियाने वेस्टइंडीज वनडे आणि T20 मॅचदरम्यान यूपीआय मनी ट्रान्सफरवर (UPI Money Transfer) कॅशबॅक आणि इतर ऑफर्सची घोषणा केली आहे. मॅचदरम्यान नवे युजर्स ‘4 ka 100 कॅशबॅक ऑफर’ चा लाभ घेऊ शकतील. Paytm ची ही ऑफर नव्या युजर्ससाठी आहे. मॅचदरम्यान त्यांना निश्चित कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. Paytm UPI द्वारे मनी ट्रान्सफर केल्यास 100 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

हे वाचा -  आता रुग्णालयातही बनणार Aadhaar Card, मराठी भाषेत देखील असणार आधार कार्डवर माहिती

त्याशिवाय युजर्स रेफरल प्रोग्राममध्ये भाग घेऊन अतिरिक्त कॅशबॅकही जिंकू शकतात. जर एखाद्या युजरने आपल्या मित्रांना-कुटुंबियांना UPI मनी ट्रान्सफर करण्यासाठी Paytm चा वापर केला, तर रेफरर आणि रेफरी दोघांकडून 100 रुपये कॅशबॅक मिळू शकेल. ऑफरला प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएमने भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल, हरभजन सिंह आणि वेस्टइंडीजचा क्रिकेटर क्रिस गेलसह एक ऑनलाइन प्रोग्राम सुरू केला आहे.

हे वाचा -  Airtel ग्राहकांना झटका, पुन्हा वाढणार Tariff Plan

लेग स्पिनर चहलने हरभजन सिंहच्या अकाउंटमध्ये 4 रुपये पाठवले. यावर हरभजनने चहलला मला 4 रुपये Paytm का केले असा प्रश्न केला. हरभजनच्या या ट्विटवर चहलने मजेशीर उत्तर दिलं आहे. ‘पाजी नया ऑफर हे पेटीएमपर…चार रुपये भेजो और 100 रुपये कॅशबॅक पाओ’. काय आहे ऑफर - Paytm ने ट्विट करत या ऑफरबाबत माहिती दिली आहे. ‘चार रुपये पाठवा आणि 100 रुपये कॅशबॅक मिळवा.’ पेटीएमची ही नवी ऑफर आहे.

संबंधित बातम्या

कसा घेता येईल फायदा - युजर्स आपल्या Paytm App चा वापर करुन काही मिनिटांत पेटीएम यूपीआयसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि कोणत्याही यूपीआय क्यूआर कोडला स्कॅन करुन पेमेंट करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या