JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Oppo च्या या फोनमध्ये असणार जगातील पहिला 50 मेगापिक्सलचा Sony कॅमेरा; जाणून घ्या फीचर्स

Oppo च्या या फोनमध्ये असणार जगातील पहिला 50 मेगापिक्सलचा Sony कॅमेरा; जाणून घ्या फीचर्स

फोन लाँच होण्याआधीच oppo reno 5 pro+ चे फीचर्स लीक झाले आहेत. reno 5 pro+ ओप्पोच्या या सीरीजमधील सर्वात हाय-एंड स्मार्टफोन ठरणार आहे. फोनची रेंडर इमेज वीबोवर लीक झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो (Oppo) आपली रेनो 5 सीरीज (Reno 5 Series) चीनमध्ये 10 डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. या सीरीजमध्ये कंपनी तीन स्मार्टफोन रेनो 5 (Reno 5), रेनो 5 प्रो (Reno 5 pro) आणि रेनो 5 प्रो प्लस (reno 5 pro+) सामिल आहे. फोन लाँच होण्याआधीच oppo reno 5 pro+ चे फीचर्स लीक झाले आहेत. reno 5 pro+ ओप्पोच्या या सीरीजमधील सर्वात हाय-एंड स्मार्टफोन ठरणार आहे. फोनची रेंडर इमेज वीबोवर लीक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनची सर्वात खास बाब म्हणजे या फोनचा कॅमेरा आहे. oppo reno 5 pro+ जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल, जो 50 मेगापिक्सल सोनी IMX7xx सीरीज लेन्ससह आहे. कॅमेरा सेन्सरमध्ये 2x Zoom सह 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. अद्याप कॅमेराच्या चौथ्या सेन्सरबाबत माहती मिळाली नाही. त्याशिवाय फोन qualcomm snapdragon 865 प्रोसेसरवर काम करेल. आजीने जमावलेल्या पैशांवर नातवाने मारला डल्ला, 2.70 लाख खात्यातून गेले गायब oppo reno 5 आणि reno 5 pro फीचर्स लीक - oppo Reno 5 5G आणि Reno Pro 5G ची माहितीही समोर आली आहे. oppo reno 5 मध्ये 6.43 इंची फुल एचडी डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, 4,300mAh बॅटरी, क्वाड रियर कॅमरा सेटअप मिळेल, ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर मिळतील. WhatsApp वर Delete केलेला मेसेजही वाचता येणार; ही आहे ट्रिक Reno Pro 5G स्मार्टफोनला 4,350mAh बॅटरी, 6.55 इंची फुल एचडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 64 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा रियर कॅमरा सेटअप असू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या