नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून हॅकिंगचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता ऑनलाईन हॅकिंग फोरमने 300 कोटीहून अधिक ईमेल आणि पासवर्ड लीक झाल्याचा दावा केला आहे. हा सर्व डेटा एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. या लीकमध्ये लिंक्डइन, Minecraft, नेटफ्लिक्स, Badoo, Pastebin आणि बिटकॉइनचे युजर्स आले आहेत. या लीकमध्ये त्या युजर्सचा डेटा अधिक आहे, ज्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे. सायबर न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, हा डेटा लीक नेटफ्लिक्स, लिंक्डइन, बिटकॉइनसारख्या प्लॅटफॉर्मवरून झाला आहे. या लीकला सीओएमबी (Compilation of Many Breaches) असं नाव देण्यात आलं आहे. लीक करण्यात आलेला 300 कोटीहून अधिक डेटा आर्काइव करण्यात आलं आहे आणि पासवर्ड प्रोटेक्टेड कंटेनरमध्ये ठेवण्यात आला आहे. 2017 मध्ये 100 कोटीहून अधिक लोकांचा डेटा लीक - count-total.sh, query.sh आणि sorter.sh सारख्या डेटाबेसमधून डेटा लीक झाला आहे. सीओएमबी डेटा लीकमध्ये, डेटा अल्फाबेटिकल क्रमाने पासवर्डसह ठेवण्यात आला. आता झालेला डेटा लीक 2017 मध्ये झालेल्या डेटा लीकप्रमाणे आहे, ज्यात 100 कोटीहून अधिक लोकांचा डेटा प्लेन टेक्स्टमध्ये लीक झाला होता.
तुमची माहिती हॅकर्सकडे तर नाही? सर्वात आधी तुमचा पासवर्ड बदला. त्याशिवाय cybernews.com/personal-data-leak-check आणि haveibeenpwned.com वर तुमचा डेटा लीक झाला आहे की नाही, याबाबतही तपासणी करू शकता.
दरम्यान, NORDPASS नावाच्या एका पासवर्ड मॅनेजमेंट कंपनीने 2020 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची लिस्ट जारी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते या वर्षीही 123456 हा पासवर्ड सर्वात कमकुवत पासवर्डच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर एक ते नऊपर्यंतचे आकडे 2 3 4 5 6 7 8 9. तर, तिसऱ्या क्रमांकावर PICTURE ONE हा सर्वात कमकुवत पासवर्ड आहे. अनेक लोकांनी पासवर्डचं स्पेलिंग अर्थात Password हाच पासवर्ड ठेवला आहे. अनेकांनी 123123 हा पासवर्ड ठेवला आहे. हे सर्वात कमकुवत पासवर्ड आहेत. त्यामुळे यापैकी कोणताही पासवर्ड ठेऊ नका.