नवी दिल्ली, 9 एप्रिल : स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया, स्मार्ट डिव्हाइस या गोष्टी सध्याच्या आयुष्यात एक भाग झाल्या आहेत. बातम्या, मूव्ही, मॅक्झिन, न्यूज पेपर अशा अनेक गोष्टी फोनवर एका क्लिकवर पाहता, वाचता येतात. या गोष्टींमुळे जीवन अधिक सोपं, सोयीचं झाल्याचं बाबही नाकारता येत नाही. असं असताना दुसरीकडे याचा अतिवापरही आरोग्यास धोकादायक ठरत असल्याचे अनेक रिपोर्ट, रिसर्च आहेत. नुकताच असाच एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर अभ्यास करण्याबाबत, वाचन करण्याबाबतचा हा रिपोर्ट आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर वाचल्यामुळे शब्दांची समज कमी होत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सायन्टिफिक रिपोर्ट्स जनरलमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या एका आर्टिकलमध्ये असा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यात स्मार्टफोनवर अति वाचन केल्याने प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये ओव्हर अॅक्टिव्हिटी होते, असंही सांगण्यात आलं आहे. आजच्या काळात अनेक जण वाचण्यासाठी मोबाइल, स्मार्टफोनचा वापर करतात अशात हा रिपोर्ट नक्कीच चिंता वाढवणारा आहे. पुस्तकं वाचण्यासाठी, न्यूज पेपर वाचण्यासाठी अनेक जण ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ऑनलाइन वाचन (Online Reading) करण्यासाठी मोबाइल किंवा इतर कोणत्याही डिजीटल स्क्रिनची गरज असते. याबाबत याआधीही अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. परंतु यावेळी अशा अति डिजीटल वाचनामुळे शब्दांची समज खराब होत असल्याचं समोर आलं आहे. याआधीच्या रिपोर्ट्समध्ये स्मार्टफोन किंवा इतर डिजीटल प्लॅटफॉर्मवर अति वाचन केल्याने डोकेदुखी, डोळ्यांच्या समस्यांबाबत सांगण्यात आलं होतं. ऑनलाइन स्क्रिनवर अति वाचन केल्याने शब्दांची समज कमी होत असल्याच्या रिपोर्टमध्ये या रिपोर्टचे ऑथर Motoyasu Honma आणि त्यांच्या टीमने दोन गोष्टी मांडल्या आहेत.
स्क्रिनवर सतत वाचन केल्याने रेस्पिरेटरी सिस्टम आणि ब्रेन फंक्शनवर परिणाम होतो आणि त्याच कारणामुळे शब्दांच्या समस्येवर परिणाम होतो. या प्रोसेसमध्ये श्वास घेण्याची पद्धतही तपासण्यात आली. अधिक दिर्घ, लांब श्वास घेतल्याचा सोशल कम्यूनिकेशनवर निगेटिव्ह परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु असं केल्याने चांगली समज विकसित होत असल्याचं आढळून आलं आहे. या संशोधनावेळी जपानमधल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात विद्यार्थ्यांना पेपर आणि स्मार्टफोन अशा दोन्हीवर वाचन करण्यास सांगण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची अॅक्टिव्हिटीही तपासण्यात आली. यात ज्या विद्यार्थ्यांनी पेपरवर वाचन केलं होतं त्यांचा परफॉर्मन्स चांगला असल्याचं आढळून आलं.