JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण फीचर्ससह OnePlus 9R; जाणून घ्या काय आहे किंमत

आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण फीचर्ससह OnePlus 9R; जाणून घ्या काय आहे किंमत

वनप्लसच्या महागड्या फोन्समध्ये कॅमेऱ्यावर हॅसलब्लाड ब्रँडिंग (Hasselblad Branding) असतं. ते या फोनच्या कॅमेऱ्यावर नाही. हा फोन वनप्लस 9 प्रो या स्मार्टफोनपेक्षा थोडा लहानही आहे. या फोनचे बाकीचे फीचर्स वनप्लस 9 सीरिजप्रमाणेच आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल : वनप्लस  या ब्रँडचे प्रीमिअम स्मार्टफोन्स लोकप्रिय आहेत. त्यामधील फीचर्स आधुनिक  आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत पण त्यांच्या किमती सर्वसामान्यांना  परवडण्यासारख्या नाहीत. गेल्या वर्षी वनप्लसने नॉर्ड हा फोन सादर करून  किमतीची रेंज थोडी खाली आणली. आता वनप्लस  9R (OnePlus 9R)  हा नवा  स्मार्टफोन सादर करण्यात आला असून तुलनेने परवडणाऱ्या किमतीत प्रीमिअम  स्मार्टफोनचा (Affordable Premium Smartphone)  अनुभव त्यातून मिळणार आहे.  इंडियन एक्स्प्रेसने या स्मार्टफोनचा रिव्ह्यू प्रसिद्ध केला आहे. वनप्लस या सीरिजमधला हा फोन असून, R  चा अर्थ परवडणाऱ्या किमतीशी संबंधित आहे. अ‍ॅपल आणि सॅमसंगने अशा प्रकारची नावं देण्याची संकल्पना गेल्या काही  वर्षांत वापरली होती. याला संमिश्र यश मिळालं. वनप्लस  9R  स्पेसिफिकेशन्स : - 6.55  इंची full HD+ (1080 x 2400पिक्सेल्स)  AMOLEDडिस्प्ले - 120Hzरिफ्रेश रेट - 240 Hzटच -क्वालकॉम स्नॅपड्रॅगन  870  प्रोसेसर - 8GB  किंवा  12GB  रॅम +  128GB  किंवा  256GB  स्टोरेज - 48MP  कॅमेरा +  16MP  अल्ट्रा वाइड कॅमेरा +  5MP  मॅक्रो कॅमेरा +  2MP  मोनोक्रोम कॅमेरा - 65W  फास्ट चार्जिंगसह  4500 mAh  बॅटरी -डॉल्बी एटॉम्ससह ड्युएल स्पीकर्स वनप्लस  9R  हा प्रीमिअम स्मार्टफोनसारखाच फोन आहे. या फोनची किंमत  39  हजार  999  रुपये आहे. डिझाइन पाहिल्यावर तरी तुम्हाला त्यात काही तडजोड केल्यासारखं  वाटणारच नाही.  वनप्लस   प्रो’  प्रमाणे आकर्षक रंगांचे पर्याय यात उपलब्ध  नाहीत. याच्या कॅमेऱ्याला चार लेन्सेस (Four Lenses)  आहेत.  वनप्लस   प्रो’  सारख्याच त्या वाटतात मात्र बारकाईने पाहिल्यावर  लक्षात येतं की त्यांचं स्पेसिंग वेगळ्या पद्धतीने ठेवण्यात आलं आहे.  वनप्लसच्या महागड्या फोन्समध्ये कॅमेऱ्यावर हॅसलब्लाड ब्रँडिंग (Hasselblad Branding)  असतं. ते या फोनच्या कॅमेऱ्यावर नाही.  हा फोन वनप्लस   प्रो या स्मार्टफोनपेक्षा थोडा लहानही आहे. या फोनचे बाकीचे फीचर्स वनप्लस   सीरिजप्रमाणेच आहेत.

(वाचा - तुमचा फोन नंबर Facebook Data Leaked मध्ये सामिल आहे की नाही; असं तपासा 

6.55  इंची फ्लुइड  AMOLED  डिस्प्ले चांगला आहे. बाहेर  वापरण्याकरता तो पुरेसा ब्राइट आहे. तसंच प्रो-गेमर्सकरता पुरेसा  व्हायब्रंट आहे. डॉल्बी  अ‍ॅटॉम्स ऑडिओ सुविधा असल्याने फोन अधिक प्रभावी  होतो. वनप्लस   सीरिज मधल्या अन्य दोन फोन्सपेक्षा याचा प्रोसेसर  (Processor)  वेगळा आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन  870 5G  प्रोसेसर आहे.(बाकीच्यांमध्ये  888  प्रोसेसर आहे.) तरीही या फोनच्या कार्यक्षमतेवर त्याचा  फारसा परिणाम झालेला नाही. हाय-एंड कॅमेरापासून गेमिंगपर्यंत  (Gaming)  विविध कामांसाठी हा फोन सक्षम आहे आणि गरम होत नाही. मल्टी-लेयरकूलिंग (Multi Layer Cooling)  आणि एक्स्ट्रा रिस्पॉन्सिव्ह टचमुळे (Extra Responsive Touch)  हा बेस्ट गेमिंग फोन्सपैकी एक फोन ठरला आहे. वनप्लस   मध्ये तीन कॅमेरे आहेत. वनप्लस  9R  मध्ये चार कॅमेरे आहेत. 48  मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 16  मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड, 5  मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेलचा मोनो किंवा डेप्थ कॅमेरा आहे.   मुख्य कॅमेराचं डिफॉल्ट सेटिंग  48  मेगापिक्सेल क्षमतेने शूट करण्याचं नाही. फोन फोटो सेव्ह करायला एखादं  सेकंद घेतो फोटोतल्या घटकांवर  झूम करून फ्रेम करून क्रॉप करून तुम्ही ते स्टँडअलोन फोटो म्हणूनही  वापरू शकता. तुम्ही काय केलंय हे कोणाच्याही लक्षात येणार नाही इतकी  कॅमेराची क्लॅरिटी चांगली आहे. 16  मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड  कॅमेरा कमी प्रकाशातही चांगली कामगिरी करतो. तसंच मॅक्रो कॅमेराचीही  कामगिरी चांगली आहे. कॅमेराचा फोकस स्पेक्ट्रमच्या दोन्ही बाजूला चांगला  आहे. तुम्हाला स्क्रीनवर जो एरिया हवा आहे तो तुम्ही नेमकेपणाने लॉक करू  शकता. या फोनवर  8K  रेकॉर्डिंगची सोय नाही पण  4K  रेकॉर्डिंग  60fps  ने ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह (Optical Image Stabilisation)  करता येतं.

(वाचा -  तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन कोणी वापरला? क्षणात असा लावा शोध )

फोनची बॅटरी  4500mAh  क्षमतेची असून, 4G  च्या रेग्युलवर वापरासह  30  तास टिकू शकते. फास्ट चार्जिंगमुळे अगदी थोडक्या वेळात पूर्ण बॅटरी चार्ज  होते. काय चांगलं नाही? या फोनमध्ये खूप मोठा काही दोष आढळलेला  नाही. तरीही मुख्य कॅमेराच्या साहाय्याने स्टिल फोटोज टिपताना किंवा व्हिडिओ  रेकॉर्ड करताना लेन्स फ्लेअरिंग होतं. हे फारसं काळजी करण्यासारखं नसलं तरी थोडंसं त्रासदायक आहे. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि वॉटर रेझिस्टन्स  या सुविधा नाहीत. वनप्लस  9R  या फोनमध्ये एकंदरीत चांगल्या सुविधा  असल्या तरी स्पर्धक फोनपेक्षा तो सरस नाही. या किमतीत सॅमसंग किंवा  ओप्पोचा फोनही एवढ्याच किमतीत एवढ्या सुविधा देतो. तरीही उत्तम ब्रँडचा फोन  तुलनेने कमी किमतीत घ्यायचा असेल तर हा चांगला फोन आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या