JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / लाँचआधीच OnePlus 9 चे फीचर्स लीक; जबरदस्त बॅटरीसह, खास असणार कॅमेरा

लाँचआधीच OnePlus 9 चे फीचर्स लीक; जबरदस्त बॅटरीसह, खास असणार कॅमेरा

वनप्लस 9 मध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तसंच 4,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह असेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : वनप्लस 9 सीरीजबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आता वनप्लस 9 चे (OnePlus 9) स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार, वनप्लस 9 मध्ये स्नॅपड्रॅगन 888SoC आणि 6.55 इंची फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. वनप्लस 9 सीरीजच्या तीन फोनबाबत मोठी चर्चा आहे. या सीरीज याच वर्षी मार्चमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. टिप्सटर टेकड्रॉइडरने AIDA64 चे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. हे एक अस सॉफ्टवेअर आहे, ज्याने डिव्हाईसची इंटरनल वनप्लस 9 ची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, वनप्लस 9 मध्ये 6.55 इंची फुल HD+ डिस्प्ले दिला जाईल. रिजोल्यूशन 1080x2400 असेल. क्वॉलकॉम 888Soc आणि Adreno 660 GPU असण्याची शक्यता आहे. 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. खास असेल कॅमेरा आणि बॅटरी - वनप्लस 9 मध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तसंच 4,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे, जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह असेल. त्याशिवाय 30fps वर 8K रिकॉर्डिंग आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टही असेल. Oneplus 9 के फीचर्स लीक हो गए हैं. कंपनीने वनप्लस 9 सीरीजच्या फीचर्सबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये असण्याची शक्यता आहे. परंतु मार्चमध्ये फोन लाँच झाल्यानंतरच याबाबत अधिक खुलासा होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या